Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : चौघे पकडले, ३० झालेत फरार; करोना काळात सट्टेबाजांकडून लाखोंचा मुद्देमालही जप्त..!

औरंगाबाद / बीड :

Advertisement

सध्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा जोमात असतानाच तिथे करोना विषाणूचे संक्रमणही पाहायला मिळत आहे. परिणामी ही स्पर्धा बंद ठेवण्याची मागणी चालू असतानाच या स्पर्धेतील सट्टेबाजीही जोमात आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संचारबंदी, जमावबंदी आदेश असतानाही नियमांचे राजरोस उल्लंघन करत आयपीएलची सट्टेबाजी अनेक ठिकाणी जोरात आहे. असाच प्रकार बीड पोलिसांनी शनिवारी उघडकीस आणला आहे. त्यात चौघांना पकडले असून तीसजण फरार झालेले आहेत.

Advertisement

चौघांना रंगेहाथ पकडण्यात आल्यावर तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित ३० संशयित पळून गेले असल्याची माहिती पेठ पोलिसांनी दिली आहे. अशोकनगर शाळेजवळ शनिवारी एका पत्र्याच्या शेडमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यावर सट्टा लावण्यासाठी टोळी जमली असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यावरून निरीक्षक विश्वास पाटील, अंमलदार सुनील अलगट, गणेश जगताप, अमोल दरेकर, महेंद्र ओव्हाळ, कलीम इनामदार, असद शेख, अन्सार मोमीन यांनी तिथे छापा टाकला.

Advertisement

त्यात शेख सर्फराज शेख इब्राहिम, शेख मतीन शेख इस्माईल(दोघे रा.बीड मामला), शेख सद्दाम शेख खुदबोद्दीन (रा.अजीजपुरा) व शेख शहबाज शेख इलियास (रा.शहेनशावली दर्ग्याजवळ) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार मोबाइल, चार दुचाकी असा दोन लाख ९९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
  •  

Advertisement

Leave a Reply