Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : वॉर्नरला कर्णधारपदावरुन दूर केल्यावर केन विल्यमसन बोलला उघडपणे ‘हे’

मुंबई :
राजस्थान रॉयल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादला ५५ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून केन विल्यमसनला कर्णधार केले. या सामन्यासाठी वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमध्येही जागा मिळाली नाही, याबद्दल विल्यमसन सामन्यानंतर उघडपणे बोलला. वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे तो म्हणाला.

Advertisement

सनरायझर्स हैदराबादच्या सुरुवातीच्या सहा सामन्यात पाच पराभवानंतर वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकले गेले. संघाने असे पाऊल उचलले तरी त्यांचे भाग्य बदलले नाही आणि रविवारी विल्यमसनच्या नेतृत्वात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. विल्यमसन सामन्यानंतर म्हणाला, ‘संघात बरेच लिडर्स आहेत. आपण चांगले काम करणे महत्वाचे आहे. संघ म्हणून संतुलन निर्माण करणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. कर्णधार म्हणाला की, संघाला रणनीतींबाबत आणि ती मैदानावर उतरवण्याबाबत स्पष्ट राहिले पाहिजे.

Advertisement

तो म्हणाला, ‘विजयासाठी जास्त चिंता करण्याऐवजी आपण कसे पुढे जावे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वॉर्नर हा एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि आम्ही बऱ्याच पर्यायांवर चर्चा करीत आहोत, मला खात्री आहे की याविषयी बरीच चर्चा होईल. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने तीन विकेट्सवर २२० धावांची मोठी धावसंख्या उभारली आणि विल्यमसनने कबूल केले की मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे नेहमीच कठीण जाते.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply