Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटरची पंतप्रधानांवर सडकून टीका

मुंबई :
भारतात सध्या कोरोनाचे प्रमाण वाढत असून भारतातील ऑस्टे्रलियन खेळाडूंना घरी परत जाण्याची परवानगी न दिल्याने क्रिकेटपटू, कॉमेंटेटर मायकेल स्लेटर याने आपल्या देशाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर टीका केली असून ही बाब अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. स्लेटर सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये कॉमेंटेटरची भूमिका साकारत आहेत. कोविडच्या उद्रेकामुळे ऑस्ट्रेलियाने भारतातून व्यावसायिक उड्डाणे बंद केली असून त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि कॉमेंटेटरची समस्या वाढली आहे.

Advertisement

आयपीएलशी संबंधित ऑस्ट्रेलियन नागरिकांना स्वत:ची व्यवस्था करावी लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. स्लेटर यांनी ट्विट केले की, जर आमच्या सरकारला ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या सुरक्षेची काळजी असेल तर ते आम्हाला मायदेशी परतण्याची परवानगी देतील. हे अपमानकारक आहे. पंतप्रधान महोदय कोणत्याही अप्रिय घटनेसाठी तुम्ही जबाबदार असाल. आपण आमच्याशी असे कसे वागू शकतात?  मला आयपीएलमध्ये काम करण्याची परवानगी सरकारने दिली होती आणि आता सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांच्या देशातील नागरिकांच्या भारतात येण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. सध्या ही बंदी १५ मेपर्यंत लागू करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, स्लेटर सध्या आयपीएल २०२१ च्या बायो बबलमधून बाहेर आले आहेत, ते मालदीवला गेले आहेत. येथून ते ऑस्ट्रेलियात परत जाण्याचा प्रयत्न करतील. यासह, स्लेटर यापुढे आयपीएल २०२१ च्या पुढील सामन्यांमध्ये दिसणार नाहीत.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply