Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : पृथ्वी शॉसाठी बॅले डान्सरची दिलवाली इमोजी..!

मुंबई :
पृथ्वी शॉने कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध पहिल्याच षटकात ६ चौकार ठोकत इतिहास रचला. पृथ्वीने कोलकाताच्या शिवम मावीवर निशाणा साधला. पृथ्वीच्या या पराक्रमामुळे प्रसिद्ध बॅले डान्सर प्राची सिंह खूप प्रभावित झाली आहे. तिने पृथ्वीचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्विकारतानाचा त्याचा फोटो आपल्या इंस्टा अकौंटवर शेअर केला आहे. सोबत हार्टची इमोजी देखील शेअर केली आहे. दरम्यान, अशी चर्चा आहे की काही महिन्यांपासून पृथ्वी आणि प्राची यांच्यात काहीतरी शिजत. तथापि, याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दोघांपैकी कोणीही दिलेले नाही.

Advertisement

आयपीएल २०२० मध्ये पृथ्वीने चेन्नईिवरुद्ध ६४ धावा केल्याबद्दल त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता, तेव्हाही प्राचीने एक पोस्ट शेअर केली होते. तेव्हापासून शॉ आणि प्राची यांच्यात काहीतरी चालू आहे असा संशय अनेकांना वाटू लागला. यापूर्वी अभिनेत्री प्राची सिंहने पृथ्वीच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंवर सतत उत्तर देत होती. शॉनेही प्राचीच्या टिप्पण्यांना उत्तर देण्यास कधी टाळाटाळ केली नाही.

Advertisement

अभिनेत्री प्राची सध्या चित्रपटसृष्टीत नवीन आहे आणि कलर्स चॅनलवरील सीरियल उडानमध्ये तीने भूमिका साकारली होती. त्याचसोबत शॉने वयाच्या १८ व्या वर्षी कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि शतक ठोकणारा सर्वात तरुण भारतीय ठरला. यासह त्याने २ सामन्यांच्या मालिकेत २३७ धावा केल्या आहेत. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply