Take a fresh look at your lifestyle.

म्हणून बिल गेट्स-मेलिंडा यांचा घटस्फोट; अशी सुरु झाली होती ‘लव्ह स्टोरी’..!

मुंबई : बिल गेट्स.. जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती. फोर्ब्स मासिकानुसार, 124 बिलिअन डॉलर इतक्या प्रचंड संपत्तीचे मानकरी.. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीचे सहसंस्थापक.. सामाजिक कार्यातही आघाडीवर असणाऱ्या बिल गेट्स (Bill Gates) आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी आपले 27 वर्षांचे नातेसंबंध अखेर संपवले आहेत. दोघांनीही एकत्र येत सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

बिल आणि मेलिंडा गेट्स (Melinda Gates) यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे, की ‘आम्ही आमचे विवाहसंबंध संपविण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला वाटते, की आपण आयुष्याच्या या टप्प्यावर आलो आहोत, जे आता आपण एकत्र पुढे जाऊ शकत नाही.’

Advertisement

बिल गेट्स यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, की “आम्ही आमच्या नात्यावर खूप विचार केला आहे. शेवटी आम्ही हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही एकत्र पुढे जाऊ शकत नाही. आम्हाला दोघांनाही आमची गोपनीयता वेगळी पाहिजे आहे आणि जीवनाच्या नवीन टप्प्यात जायचे आहे.”

Advertisement

घटस्फोटानंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांचे आर्थिक संबंध कसे असतील, याविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, दोघेही परोपकारी कामात गुंतलेल्या ‘बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ या संस्थेचे विश्वस्त आहेत. 2000 मध्ये त्यांनी ही संस्था स्थापन केली होती. घटस्फोट होणार असला, तरी सामाजिक कार्यासाठी ते एकत्र असतील, असं या दोघांनी म्हटलं आहे.

Advertisement

अशी बहरली ‘लव्ह स्टोरी’!
70च्या दशकात बिल गेट्स यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून बिल यांना पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा असं सारं काही भरभरून मिळालं. बिल आणि मेलिंडा यांची 1987 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीतच पहिली भेट झाली होती. मायक्रोसॉफ्ट कंपनीत ‘प्रॉडक्ट मॅनेजर’ (Product Manager) म्हणून मेलिंडा रुजू झाली. 1987मध्ये मेलिंडा यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’साठी काम करायला सुरुवात केली. ‘बिझिनेस डिनर’च्या निमित्ताने दोघांमध्ये संवाद सुरु झाला आणि नंतर त्यांच्यात मैत्री होत गेली. नातेसंबंध बहरले.

Advertisement

‘नेटफ्लिक्स’ (Netflix) वरच्या एका ‘डॉक्युमेंटरी’त बिल यांनी सांगितलं, की न्यूयॉर्क शहरात एका ‘बिझनेस डिनर’ला ते पहिल्यांदा एकत्र गेले होते. या डिनरनंतर दोघांमधलं नातं बहरू लागलं. आम्ही एकमेकांना समजून घेऊ लागलो. एकमेकांची काळजी घेऊ लागलो. अशा वेळी दोनच गोष्टी होऊ शकतात- एक तर ब्रेकअप, नाहीतर लग्न.

Advertisement

1994 मध्ये या दोघांनी लग्न केलं. हवाईतील एका बेटावर त्यांचं लग्न झालं. लग्नाच्या वेळी बिल यांनी त्या भागातील सगळी हेलिकॉप्टर्स सेवा बुक केली होती. जेणेकरून लग्नाला आगंतुकांना येता येऊ नये. अशा रितीने प्रेमाचा शेवट गोड लग्नात झाला होता. तब्बल 27 वर्षे हे जोडपे एकत्र राहत होते. या काळात त्यांना तीन मुले झाली. आयुष्याच्या एका वळणावर त्यांनी या नात्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. अगदी दोघांच्या सहमतीने..!

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply