Take a fresh look at your lifestyle.

‘बेचा पाढा म्हण..’ सात फेरे घेण्याआधी नवरीची मागणी, अडाणी नवरोबाला भर मंडपातून पिटाळले!

लखनऊ : मंडप सजलेला.. नवरा-नवरी मंडपाच्या दारी आले.. सनईच्या सुरात बोहल्यावर चढले. काही क्षणातच अंगावर अक्षदांचा वर्षाव होणार.. तोच नवरीने (Bride) नवरदेवाची (Groom) परीक्षा घेण्याचं ठरवलं. सात फेरे घेण्याआधी त्याला ‘बेचा पाढा’ म्हणण्यास सांगितलं. मात्र, गणिताच्या परीक्षेत नवरोबा फेल झाला. अडाणी नवरोबाची भर मंडपातून हकालपट्टी करण्यात आली.

Advertisement

उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यात ही घटना घडली. महोबामधील एका गावात शनिवारी ‘अरेंज मॅरेज’ (Arrange Marriage) होणार होतं. त्यासाठी संध्याकाळी नवरदेवाची वरात मंडपात आली. मात्र, त्याआधीच नवरीला कुठून तरी माहिती मिळाली, की जितकं त्यानं सांगितलं, तितका नवरदेव शिकलेला नाही. मग काय, नवरीनं फेरे घेण्याआधीच त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं.

Advertisement

एकमेकांना वरमाला घालण्याची वेळ आली, तेव्हा नवरीनं नवरदेवाला दोनचा पाढा म्हणायला सांगितलं. अचानक झालेली नवरीची ही भलतीच मागणी ऐकून नवरदेव आश्चर्यचकीत झाला. सुरुवातीला सर्वाना हा चेष्टेचाच विषय वाटलं. मात्र, नवरीनं पुन्हा ओरडून त्याला पाढा म्हणण्यास सांगितल्यावर सगळा नूरच पालटला. खूपदा प्रयत्न करूनही नवरदेवाला काही पाढा म्हणता आला नाही. त्यामुळे तरुणीनं त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.

Advertisement

पनवरी ठाण्याचे एसएचओ विनोद कुमार यांनी सांगितलं, की नवरदेवाला दोनचा पाढा म्हणता न आल्यानं नाराज झालेल्या नवरीनं ऐनवेळी लग्नास नकार दिला. तिनं म्हटलं, की ती अशा व्यक्तीसोबत लग्न करू शकत नाही, ज्याला गणिताचं साधं ज्ञानही नाही. मुलीच्या घरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र ते अपयशी ठरले.

Advertisement

नवरीच्या चुलतभावानं सांगितलं, की नवरदेवाच्या घरच्यांनी त्याच्या शिक्षणाबाबत आम्हाला खोटी माहिती दिली होती. बहुतेक तो शाळेतही गेला नसावा. त्याच्या कुटुंबीयांनी आम्हाला धोका दिला. मात्र, माझ्या शूर बहिणीनं लोक काय म्हणतील, ही भीती बाजूला ठेवून लग्नाला नकार दिला.

Advertisement

पोलिसांनी सांगितलं, की दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांसोबत चर्चा केली. एकमेकांना दिलेले सर्व वस्तू आणि दागिने परत देण्यास ते तयार झाले आहेत. त्यामुळे, पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही केस दाखल केली नाही.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply