Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळ्यात अशी घ्या आपल्या ड्रीम कारची काळजी; वाचा आणि त्यानुसार कार्यवाही करा नाहीतर..

पुणे :

Advertisement

यंदाही सध्या कडाक्याचे उन पडले आहे. उन्हाळ्यात वाहनांच्या टायर्सचा दबाव आपोआप वाढतो. ज्यामुळे त्याचे स्फोट होण्याची भीती असते. वाहन जास्त तापल्यास कार बंद पडण्याचाही धोकादेखील आहे. त्यामुळे वाहन विकत घेण्यापूर्वी इतर फीचर्स निवडण्यावेळी रंगदेखील लक्षात घेतला पाहिजे. तसेच कडक उन्हामुळे कारचा रंग उडण्याची भीतीही आहे. आज आपण कारचे आरोग्य कसे चांगले ठेवू शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Advertisement

उन्हात पार्क करू नका : जेव्हा आपण कुठेही प्रवास करत नसता तेव्हा आपली कार गॅरेजमध्ये ठेवण्याचा एक पर्याय आहे. परंतु, प्रवासादरम्यान आपल्याला बाहेर उन्हात कार पार्क करावी लागते तेव्हा केवळ त्याचा रंग उडत नाही तर ती गरम होऊ लागतो. अशावेळी आपली कार सावलीत पार्क करा. याशिवाय आपल्या कारसाठी छत्री मिळवणे हा आणखी एक पर्याय आहे. कारसाठी छत्री तुम्हाला बाजारात सहज मिळेल.

Advertisement

कार पॉलिशद्वारे रंग वाचवा : उन्हाळ्यात वाहनाचा रंग उडत राहतो. हे टाळण्यासाठी उन्हाळ्यात कारची अल्ट्राव्हायोलेट यूव्ही प्रोटेक्शन पॉलिश करून घ्यावी. पॉलिशमुळे पक्ष्यांनी गाडीवर केलेल्या घाणीमुळेही रंग खराब होण्यापासून वाचतो.

Advertisement

सनशेड वापरा : वाहनांच्या काचेवर सनशेड्स वापरुन आतील तापमान वाढण्यापासून टाळता येते. काचेवर सनशेड्स वापरल्याने कारमधील प्लास्टिकचे संरक्षण होईल आणि ते वितळण्यापासून किंवा फुटण्यापासूनचा धोका कमी होईल.

Advertisement

आठवड्यातून एकदा टायर्स प्रेशर आणि कुलंट तपासा : उन्हाळ्यात टायरचा दबाव अचानक वाढतो आणि त्याच्या फुटण्याची शक्यता वाढते. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून सावधगिरी बाळगणे अगोदरच आवश्यक आहे. यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा टायर्सचा दबाव तपासला पाहिजे. तसेच उन्हाळ्यात कुलंट (शीतलक) तपासा. कारण ते वाहनचे इंजिन थंड ठेवतात.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply