Take a fresh look at your lifestyle.

बातमी रक्ताच्या नात्याची : कोरोनाच्या काळातही ‘स्वयंभू युवा’तर्फे १०३ रक्तपिशव्या संकलित

अहमदनगर :

Advertisement

कोरोना संसर्ग काळातही स्वयंभू युवा प्रतिष्ठाणने शासनाचे नियम पाळत रक्तदान शिबीर घडवून आणले. श्रीगोंदा शाखेने रक्तदान करण्याचे ठरविले होते. त्यासाठी अगोदर नोंदणी करून मग हे रक्तदान घेण्यात आले. त्यामध्ये १०३ युवा शिलेदारांनी रक्तदान केले.

Advertisement

नात रक्ताच या उपक्रमांतर्गत गेल्या ४ वर्षापासून अविरतपणे २४ तास रक्तपुरवठा करण्याचे कार्य स्वयंभू युवा प्रतिष्ठाण करत आहे. रक्ताअभावी कुणाचा जीव जाऊ नये म्हणून अहमदनगर जिल्हात स्वयंभू युवा प्रतिष्ठाणने रक्तरक्तसाखळी सुरू केली आहे.  १३ रक्तदान शिबिरांमध्ये १८०० रक्तपिशव्यांचे संकलन केले असून ८५० रक्तपिशव्या गरजू रुग्णांना मोफत वाटप केले आहे. अजूनही अविरतपणे हे काम चालू आहे.

Advertisement

आजच्या कार्यक्रमातही श्रीगोंदा शहरातील युवकांनी हिरीरीने सहभाग दाखवत भव्य महारक्तदान केले. या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार प्रदीप पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, डॉ. संघर्ष राजुळे, नगराध्यक्ष शुभांगीताई मनोहर पोटे, शारदा विद्या निकेतनचे अध्यक्ष दिपक होनराव, अशोक होनराव व मुख्याध्यापक मखरे सर तसेच आरोग्य विभागाचे पंडित साहेब व लटके साहेब, स्वयंभू युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सागर नगरे हे उपस्थित होते. 

Advertisement

रक्तदान केलेल्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी अंकुर सिड्सचे संजय सुळे, खुरांगे साहेब व श्रीगोंदा नगरपरिषद चे नगरसेवक महावीर पटवा यांनी बॅग वाटप केले. सदर शिबिरासाठी प्रसाद टकले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.  या शिबिरासाठी कार्यध्यक्ष सौरभ राऊत, मिडिया प्रमुख पवन क्षिरसागर, जयराज गोरे, धिरज राऊत, अक्षय दांडेकर, रोहन क्षिरसागर, अबरार शेख यांनी मोलाचे सहकार्य केले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply