Take a fresh look at your lifestyle.

नागपूरकरांनो, काळजी घ्या; कारण सापडला आहे डबल म्यूटंट स्ट्रेन

नागपूर :

Advertisement

महाराष्ट्रात करोना रुग्णासंख्येचा वेग अवघ्या जगाला चिंतेत टाकणारा आहे. त्यातच औषधे, ऑक्सिजन आणि करोना लस यांचा तुटवडा जोरात चालू आहे. अशावेळी केंद्र सरकारने तातडीने आणखी मदत करण्याची मागणी आहे. त्यातच आता नागपूर शहरातील करोना रुग्णांमध्ये डबल म्यूटंट स्ट्रेन सापडला आहे.

Advertisement

होय, रुग्णसंख्या वाढीचा वेग रोखण्यासाठी आता सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे. घरात सुरक्षित राहण्यासह खूप आवश्यक असेल तेंव्हाच बाहेर पडण्याबाबतच्या प्रशासकीय सूचनांचे पालन सर्वांनी करावे. कारण,  नागपुर शहरात कोरोना व्हायरसचे डबल म्यूटंट आढळले आहे. सर्दी, खोकला आणि ताप ही या स्ट्रेनचे नवीन लक्षण आहेत.

Advertisement

74 सॅम्पलमधील 35 सॅम्पलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 5 नवे स्ट्रेन आढळल्याचे समोर आले आहेत. तर इतर 26 सॅम्पलमध्ये डबल म्यूटेशन असल्याचे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील मायक्रो बायोलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे यांनी दिली आहे. सॅम्पल नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये आलेल्या संशयित रुग्णांचे असून एनआयव्ही पुणे आणि एनसीडीसी दिल्ली येथे तपासणी करीता पाठवण्यात आले होते.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply