Take a fresh look at your lifestyle.

अवकाळीची शक्यता : चार जिल्ह्यात ऑरेंज, तर २६ मध्ये येलो अलर्ट; पहा कुठे होणार गारपीट

पुणे :

Advertisement

चालू आठवडा जोरदार अवकाळी पावसाचा असण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यभरात कुठे ना कुठे पाउस होत असतानाच आता पुढचे पाच-सहा दिवसही तसेच पावसाळी असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने असा अलर्ट दिलेला  आहे. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Advertisement

दि. ४ ते ८ मे २०२१ या कलवधिअत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटलेले आहे. चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज, तर २२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. आग्नेय मध्य प्रदेश ते उत्तर छत्तीसगड दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती आणि मराठवाडा, झारखंड ते कर्नाटक, तेलंगण, रायलसीमा ते तामिळनाडूची दक्षिण किनारपट्टी या मोठ्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने अशा पद्धतीने जोरदार पाउस होईल असे म्हटलेले आहे.

Advertisement

यलो अलर्ट भाग : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, तर, पश्चिम महाराष्ट्र भागातील पुणे, अहमदनगर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह २.५ ते ६४ मिमी पावसाची शक्यता आहे.
ऑरेंज अलर्ट भाग : सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या चार जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह १५ ते ६५ मिमी पावसाची शक्यता. काही ठिकाणी जोरदर गारपिटीची शक्यताही हवानाम विभागाने व्यक्त केली आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply