Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अदानी पोर्टला मिळालाय 288 % नफा; शेअरधारकांना मिळालाय ‘इतका’ बोनस..!

मुंबई :

Advertisement

देशातील सर्वात मोठी पोर्ट कंपनी असलेल्या अदानी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक झोन (Adani Ports & SEZ) यांनी आर्थिक निकाल जाहीर केला. जानेवारी ते मार्च 2021 या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 288 टक्क्यांनी वाढून 1321 कोटी झाला आहे. जानेवारी ते मार्च 2020 या कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 340.21 कोटी होता. कंपनीने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 5 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

Advertisement

कंपनीने बीएसईला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, चौथ्या तिमाहीत त्याचे एकत्रित एकूण उत्पन्न 4,072.42 कोटी रुपये झाले. मागील वर्षाच्या याच काळात हे उत्पन्न 3,360.17 कोटी रुपये होते. कंपनीचा एकूण खर्च चौथ्या तिमाहीत 2,526.91 कोटी रुपयांवर आला आहे, जो मागील वर्षातील चौथ्या तिमाहीत 3,099.18 च्या तुलनेत होता.

Advertisement

कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न जानेवारी ते मार्च 2021 या कालावधीत सुमारे 24 टक्क्यांनी वाढून 3,608 कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत ते 2,921 कोटी रुपये होते. 2020-21 या संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण ऑपरेटिंग उत्पन्न 6 टक्क्यांनी वाढून 12,550 झाले. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये हा आकडा 11,873 कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्षातील 7,560 कोटी रुपयांच्या तुलनेत मालवाहतुकीची वाढ आणि अधिक चांगली कार्यक्षमता यामुळे कंपनीच्या बंदर व्यवसायाचा ईबीआयटीडीए 15 टक्क्यांनी वाढून 6,593 कोटी झाला आहे.

Advertisement

निकाल जाहीर करताना अदानी पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी म्हणाले की, चालू वर्षी कंपनीच्या वाढीसाठी मोठ्या संधी मिळाल्या आहेत. मुंद्रा पोर्ट यावर्षी देशातील सर्वात मोठे बंदर बनले आहे. कंपनीने या वर्षात कृष्णापट्टनम बंदर, गंगावरम बंदर, दिघी बंदर आणि सुरगुजा रेल लाईनदेखील ताब्यात घेतल्याने आता कंपनीकडे देशातील एकूण 13 बंदरे आहेत. रेल्वे ट्रॅकच्या पुनर्रचनेमुळे आता कंपनी भारतीय रेल्वेबरोबर भागीदारी करण्यास तयार आहे. याव्यतिरिक्त, कंपनी आता पीपीपी मॉडेलअंतर्गत देशातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे मार्गांमध्ये गुंतवणूक करेल.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply