Take a fresh look at your lifestyle.

‘बायकोला कसे ठोकायचे..!’ अमेरिकेत सर्वाधिक ‘गुगल सर्च’, तर बायकांनी केलंय हे ‘सर्च’..

नवी दिल्ली : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून कर्ते-धर्ते घरातच अडकून पडले आहेत. काही जण ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. नवरा ऑफिसला गेल्यावर घरातील बायका काहीशा ‘रिलॅक्स’ होत. मनमोकळं जगत.. पण नवरा घरातच राहायला लागल्यावर महिलांचे हे स्वातंत्र हिरावून घेतले गेले. त्यात घरी बसून असलेला नवरा सतत काही ना काही मागणी करीत राहतो. त्याच्या पुढे पुढे करण्यातच बायकांचा जीव मेटाकुटीला आला. त्यातून घरातील शांतता भंग झाली. कुरबुरी वाढल्या. घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढले.

Advertisement

जगभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असताना महिलांना घरगुती हिंसाचाराला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागल्याच्या बातम्या येत होत्याच.. पण अमेरिकेतील परिस्थिती फारच भयानक असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

गतवर्षी कोरोना काळात घरी अडकून पडलेल्या अनेकांनी व्यवसाय, शिक्षण पुन्हा रुळावर कसे आणायचे, यासाठी मोठा ‘गुगल सर्च’ (Google Search) केला, पण त्याच वेळी अमेरिकेतील पुरुष मात्र ‘बायकोवर नियंत्रण कसे मिळवायचे आणि दुसऱ्यांना कळणार नाही अश्या बेताने बायकोला कसे ठोकून काढायचे’ हे सर्वाधिक सर्च करत असल्याचा खुलासा एका अभ्यासातून समोर आला आहे.

Advertisement

न्यूझीलंडच्या ओटागो विद्यापीठातील लेखिका कॅतरिना यांनी ‘जर्नल टेलर अँड फ्रान्सिस’ (journal tailor and fransis) मध्ये हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्यांनी ‘अमेरिका-२०२० गुगल सर्च ट्रॅकिंग’ केले आणि त्यांच्या समोर धक्कादायक आकडेवारी आली. सुमारे १६.५ कोटी वेळा ‘गुगल’ला बायकोवर नियंत्रण कसे आणायचे आणि दुसऱ्यांना कळू नये, या पद्धतीने मारपीट कशी करायची, यासाठी विचारणा केली गेली होती.

Advertisement

कॅटरिना सांगतात, की हे अध्ययन करताना अनिश्चितता, असुरक्षा, हताशपण, हिंसा करणार असल्याचे पुरुषांकडून दिले गेलेले सांकेतिक इशारे, असे विविध पर्याय देऊन ‘सर्च’ केल्यावर महिला दुर्व्यवहार घटनात २०२० मध्ये ३१ टक्कांवरून १०६ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.

Advertisement

याउलट महिलांनी केलेल्या ‘गुगल सर्च’मध्ये पुरुष हिंसेपासून बचाव कसा करायचा, हा विषय १२२ कोटी वेळा ‘सर्च’ केला गेला. तसेच ‘मदत करा, मला मारेल’ असा विषय १.०७ कोटी वेळा ‘सर्च’ केल्याचे दिसून आले.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement
1 Comment
  1. Sunita Patil says

    भयंकर आहे !

Leave a Reply