Take a fresh look at your lifestyle.

बायकोने कापला तलवारीने केक, पतीराजाने केकऐवजी खाल्ली जेलची हवा..! पहा कुठे झालाय हा प्रकार?

औरंगाबाद : ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात तलवारीने केक कापतानाचे एक दृश्य आहे. त्यानंतर जेथे-तेथे असे प्रकार होऊ लागले. तरुणाईची तर ही ‘फॅशन’च (Fashion) झाली. मात्र, बायकोने तलवारीने कापलेल्या केकमूळे तिच्या पतीराजाला केकऐवजी चक्क जेलची हवा खावी लागली. हातात थेट बेड्या पडल्या नि लग्नाचा वाढदिवस या नवऱ्याला चक्क जेलमध्ये साजरा करावा लागला.

Advertisement

लग्नाचा वाढदिवस म्हणजे पती-पत्नीच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. हा दिवस काहीतरी तुफानी करून साजरा करणे, एका जोडप्याच्या चांगलेच अंगलट आले.. औरंगाबादमध्ये (Aurangabad) एका पतीने आपल्या पत्नीसोबत चक्क ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईल तलवारीने केक कापल्याचा प्रकार नुकताच समोर आला. केक कापण्याचा व्हिडीओ मोठ्या हौसेने त्याने सर्वत्र शेअर केला. पाहता पाहता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. थेट पोलिसांपर्यंत पोचला. पोलिसांनी त्याची तातडीने दखल घेत पतीराजाला जेलमध्ये डांबले.

Advertisement

औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोडप्याने घरी केक मागवला होता. त्यानंतर पत्नीच्या हातात तलवार देऊन दोघांनी दिमाखात केक कापला. त्याचे मोबाईलवर शूटिंगही केले. तो मित्रांना पाठवला. पाहता पाहता तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. पोलिसांनाही मिळाला.

Advertisement

पोलिसांनी लगेच पावले उचलत या इसमाला शोधत घर गाठले. विश्रांतीनगरमध्ये हा तरुण राहतो. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, घरातील पलंगाखाली लपवून ठेवलेली तलवार सापडली. पोलिसांनी तलवार जप्त करून तरुणास अटक केली.

Advertisement

विशेष म्हणजे, हा इसम कुठलाही गुन्हेगार नाही. आपली नोकरी भली नि आपण भले. अशा एका चौकटीत राहणारा एक युवक आहे. नांदेडहुन त्यानं तलवार आणून घरी ठेवली होती. पण, तलवार बाळगणेच तरुणाला चांगलेच महागात पडले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply