Take a fresh look at your lifestyle.

‘एसबीआय’च्या एटीएमवर २० लाखांचा मोफत विमा, तुम्हाला माहितीय का ‘ही’ योजना?

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया.. देशातील महत्वाच्या बँकांपैकी एक बँक. सर्वाधिक खातेदार, सर्वाधिक उलाढाल असणारी सरकारी बँक. आपल्या खातेदारांना या बँकेकडून वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जातात. त्यात अकाऊंट, कर्ज, डेबिट कार्ड, याची तुम्हाला माहिती असेलच!.

Advertisement

बँकेकडून दिल्या जाणाऱ्या अशा काही सुविधा आहेत, ज्याविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यापैकीच एक म्हणजेच बँकेकडून दिला जाणार मोफत विमा. होय.. अगदी मोफत आपणास ‘एसबीआय’च्या या विमा योजनेचा लाभ मिळू शकतो. फक्त अकाऊंटच्या माध्यमातूनच नाही, तर एसबीआय एटीएम कार्डच्या माध्यमातूनसुद्धा हा विमा मिळतो.

Advertisement

तुम्हाला एसबीआय एटीएमच्या माध्यमातून 20 लाखांपर्यंत विमा मिळू शकतो. हा एक अपघाती मृत्यू विमा आहे. ज्याचा फायदा एकूण 40 कोटीपेक्षा जास्त ग्राहकांना मिळत आहे. या विम्याला ‘कॉम्प्लीमेंटरी विमा कव्हर’ म्हटलं जातं. कोणत्याही खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास या विम्यासाठी ‘क्लेम’ करता येतो.

Advertisement

एसबीआयच्या फ्री अपघाती मृत्यू विम्याबद्दल सांगायचं झालं, तर रस्ते अपघातात एकूण 10 लाख, तर हवाई प्रवासादरम्यानच्या अपघातात मृत्यू झाल्यास 20 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा मिळू शकतो. ग्राहकांकडे असणाऱ्या एटीएम कार्डनुसार हा विमा दिला जातो. त्यासाठी तुमचे एटीएम कार्ड अ‌ॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे. तसेच दुर्घटना होण्याअगोदर 90 दिवसांपूर्वी त्याचा उपयोग झालेला असावा.

Advertisement

कोणत्या कार्डवर किती लाभ?

Advertisement
  • तुमच्याकडे SBI Gold (MasterCard/Visa) असेल, तर रस्ते अपघातासाठी 2 लाख, तर हवाई अपघातासाठी 4 लाख रुपयांचा अपघाती मृत्यू विमा मिळू शकतो.
  • तुमच्याकडे SBI Platinum (MasterCard/Visa) एटीएम कार्ड असेल, तर 5 ते 10 लाखांपर्यंत अपघाती आरोग्यविमा मिळू शकतो.
  • तुमच्याकडे SBI Pride (Business Debit) (MasterCard/Visa) असेल, तर 2 लाख आणि 4 लाखांचा अपघाती विमा मिळू शकेल.
  • SBI Premium (Business Debit) (MasterCard/Visa) कार्ड असेल, तर 5 लाख आणि 10 लाख रुपयांचा अपघाती मृ्त्यू विमा मिळेल.
  • तुमच्याकडे SBI Visa Signature/MasterCard Debit Card असेल, तर रस्त्यावर अपघात झाल्यास 10 लाख आणि हवाई प्रवासादरम्यान अपघात झाल्यास 20 लाख रुपयांपर्यंत अपघाती मृत्यू विमा उतरवला जाऊ शकतो.

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply