Take a fresh look at your lifestyle.

Assembly Election Result 2021 : केरळमध्ये भाजपला मिळाले ‘हे’ महत्वाचे यश..!

दिल्ली :

Advertisement

केरळ राज्यामध्ये भाजपला मागच्या (2016 विधानसभा) निवडणुकीत अवघा एक आमदार निवडून आणण्यात यश आलेले होते. आताच्या 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ती एक जागाही राखने भाजपला शक्य झालेले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या भाजपला इथून मतदारांनी हद्दपार केल्याची भावना भाजपच्या विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असू शकते. मात्र, हे तसे नसून भाजपला या निवडणुकीत या राज्यात महत्वाचे ‘यश’ मिळाले आहे.

Advertisement

2016 च्या निवडणुकीत भाजपला एक जागा मिळाली होती. त्यावेळी या पक्षाला 10.6 टक्के मतदान मिळाले होते. आताच्या निवडणुकीत या पक्षाने त्यात सुधारणा केली आहे. करोना संक्रमणाची दुसरी लाट तीव्र झालेली असल्याने भाजपच्या विरोधात देशभर लाट असतानाही या राज्यात यंदा 11.3 टक्के मतदान भाजपने मिळवले आहे. भलेही ही वाढ थोडी आहे. मात्र, भविष्याच्या निवडणुकीवर डोळा ठेऊन काम करणाऱ्या भाजपसाठी हेही यश काही कमी नाही. त्यामुळेच पुढील निवडणुकीत भाजप या राज्यात डावी आघाडी आणि काँग्रेस यानान जोरदार टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Advertisement

केरळ (एकूण जागा : 140)

Advertisement
राजकीय पक्षमिळालेल्या जागामतदान टक्केवारी
कम्युनिस्ट पार्टी177.58
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी6225.38
काँग्रेस2125.12
मुस्लीम लीग158.27
भाजप011.3
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply