Take a fresh look at your lifestyle.

Assembly Election Result 2021 : आणि म्हणून बंगाल की स्ट्रीट फायटर बेटी बनली भारताची दीदी..!

कोलकाता :

Advertisement

पश्चिम बंगालमधील सलग तिसर्‍या विजयाने हे पुन्हा एकदा हे स्पष्ट केले की ममता बॅनर्जी एक ‘लढवय्या’ आहेत. या विजयानंतर त्यांनी हे देखील सिद्ध केले की, बंगालमध्ये त्यांच्यासारखा दुसरा कोणीही नेता नाही. या यशानंतर ममतांना आता राष्ट्रीय राजकारणातील तिच्या मोठ्या भूमिकेबद्दलही विचार करण्याच्या ऑफर्स येऊ शकतात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गैर-भाजपा पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले पाहिजे, असाही सूर यानिमित्ताने आळवला जाऊ लागला आहे. कारण बंगालमध्ये ‘दीदी’ म्हणून ओळखल्या बंगालच्या स्ट्रीट फायटर ममता बॅनर्जी आता डावी आघाडी, काँग्रेस आणि भाजप या भारतातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना पराभूत करून विजयी झालेल्या नेत्या बनल्या आहेत.

Advertisement

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षापासून याची सुरुवात केली. 1970 मध्ये तरुण असताना त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे काम सुरू केले. पुढे 1984 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोमनाथ चटर्जी यांचा पराभव केला. मात्र, बंगालमधील फ़क़्त डाव्या सरकारचा विरोधी पक्ष म्हणून बॅनर्जी यांना आवडले नाही. त्यांनी या लढाईला बंगाल की स्ट्रीट फायटरचे स्वरूप दिले. काँग्रेस सोडून त्यांनी मग तृणमूल काँग्रेस स्थापन केली. त्या रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना अनेकदा जखमी झाल्या. स्लीपर चप्पलवर फिरून त्यांनी सहकारी कार्यकर्त्यांचे सक्षम जाळे उभे केले. डाव्या सरकारला सत्तेतून पळवून लावण्यासाठी त्यांनी ही लढाई उभी केली. त्यासाठी त्यांनी नंदीग्राम आणि सिंगूर येथे राजकीय केंद्र बनवले. डाव्यावर निशाणा साधत आणि गोरगरीबांचा आवाज असल्याचा दावा करत ममता यांनी 2011 मध्ये डाव्या पक्षाचे सरकार राज्यातून उखडून टाकले.

Advertisement

डाव्यांचा पराभव केल्याच्या दशकानंतर आता बॅनर्जी यांनी भाजपला पराभूत केले आहे. बॅनर्जी हे एकेकाळी भारतीय जनता पक्षाचेसमवेत काम करी होत्या. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्या रेल्वेमंत्रीदेखील (1998) होत्या. मात्र, त्यावेळीही त्याचे संपूर्ण लक्ष बंगालवर होते. मुस्लीम मतांच्या जीवावर डाव्यांना पराभूत करता येईल हे समजल्यावर त्यांनी मध्यममार्गी होत भाजपपासून अंतर ठेवण्यास सुरवात केली. आणि मग त्यांनी राज्यही ताब्यात घेतले. पुढे त्यांचा आक्रस्ताळेपणा खूप वाढला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपने 18 जागा जिंकल्या. भाजपाचा विजय ममतांसाठी धोक्याची घंटा बनला आणि येथूनच त्यांनी बरीच सुधारणा करण्यास सुरवात केली. पहिली पायरी म्हणजे त्यांनी प्रशांत किशोर यांना आपले सल्लागार म्हणून नियुक्त केले. कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्या जनतेपर्यंत पोहोचल्या. मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे राजकारण सौम्य करतानाच त्यांनी स्वतःला हिंदू म्हणून वर्णन करण्यास सुरवात केली. ममताचे अनेक कार्यकर्ते व नेते पक्ष सोडतच राहिले, पण बॅनर्जींनी आपला स्वभाव सोडला नाही.

Advertisement

आता या विजयाने बंगाल की स्ट्रीट फायटर बेटी थेट भारताची दीदी बनली आहे. त्यामुळे आता भाजप विरोधक राजकीय पक्षांची मोट बांधून देशामध्ये लोकशाही आणण्याची हाक देणाऱ्या नेत्यांनी असा प्रयत्न सुरू केला आहे. त्यात या राजकीय पक्षांना कितपत यश मिळते, हे समजण्यासाठी आणखी खूप अवकाश आहे म्हणा.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply