Take a fresh look at your lifestyle.

‘त्यांना’ दिली होती थेट मारण्याची धमकी; ममता दिदींचा धक्कादायक दावा..!

कोलकाता :

Advertisement

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. मात्र, तरीही येथे भाजपने एकाच झटक्यात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. त्याचवेळी अगोदरच वर्षभरापासून या राज्यात भाजप व तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये रक्तरंजित संघर्ष चालू होते. मतमोजणी आणि निकाल जाहीर झाल्यावरही तो थांबलेला नाही. त्यातच ममता बॅनर्जी यांनी आणखी एक धक्कादायक दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर खळबळजनक दावा केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, नंदीग्रामच्या निवडणूक अधिका-यांनी मला सांगितले होते की मतदानाची पुन्हा मोजणी केल्यास त्यांचे आयुष्यच संकटात येऊ शकते. त्यामुळे तिथे पुन्हा रीकाउंटिंग केली गेली नाही. एकूणच त्यांच्या या दाव्याने तिथे निवडून आलेले भाजपचे शुभेंदू अधिकारी हे संशयास्पद पद्धतीने निवडून आल्याची चर्चा चालू झालेली आहे.

Advertisement

या राज्यात केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यात संघर्ष पुढील कालावधीत आणखी फोफावण्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीत गोंधळ झाल्याचे ममता दिदींनी यापूर्वीही म्हटले आहे. तसेच आठ टप्प्यात निवडणूक घेतल्याने आता या राज्यात करोना विषाणूचा प्रकोप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच असे आरोप-प्रत्यारोप चालू झाल्याने आता या राज्यातील जनतेसमोर नेमके काय वाढून ठेवले आहे, यावरही चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

टीएमसीच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) वेगवेगळ्या आस्थापनांवरील हल्ले होऊ लागले आहते. याच्याही बातम्या येत आहेत. याबाबत ममता बॅनर्जी यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. निकालच्या औपचारिक घोषणेनंतर निवडणूक आयोगाने नंदीग्राममधील निकालावर कसे बदल केले ते ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. याबाबत न्यायालयातही जाण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, प्रथमच कोणत्याही पंतप्रधानांनी अभिनंदन करण्यासाठी फोन न केल्याचे यंदा घडले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर ममता दीदींचे अभिनंदन केलेले आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply