Take a fresh look at your lifestyle.

विलगीकरणाचे ‘हे’ नियम आहेत ना माहिती..; नसतील तर वाचा आणि इतरांनाही शेअर करा

अहमदनगर :

Advertisement

सध्या करोना विषाणूची बाधा म्हणजे पाठोपाठ येणारी भीती. मात्र, अशावेळी घाबरून जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्या. लक्षणे दिसल्यावर तातडीने टेस्ट करून घेउन मग आपल्याला असलेल्या त्रास आणि टेस्टचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. तसेच विलगीकरण कक्षात राहताना सर्व गोष्टी काळजीपूर्वक करण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अहमदनगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे आणि डॉ. सचिन वहाडणे यांनी केले आहे.

Advertisement

त्यांनी विलगीकरणामध्ये असताना घेण्याच्या काळजीचे मुद्दे सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणे :

Advertisement
 1. स्वतंत्र खोलीत आणि जिथे वेगळे संडास व बाथरूम असेल अशाच ठिकाणी रुग्णाचे विलगीकरण करावे.
 2. रूममधून बाहेर येणे टाळावे, तसेच एकच संडास व बथारून वापरत असल्यास वापर झाल्यावर ते व्यवस्थितपणे सॅनिटाइज करून घ्यावे.
 3. विलगीकरण खोली आणि संडास-बाथरूम हे रुग्णानेच काळजीपूर्वक स्वच्छ करून घ्यावे.
 4. रुग्णाने वापरलेली भांडी आणि कपडे गरम पाण्यात किमान 30 मिनिटे ठेऊन मग वेगळे धुवावे.
 5. दिवसभरात 3-4 लीटर पाणी रुग्णाने प्यावे.
 6. आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा वापर असावा.
 7. रोजचे श्वसनाचे व्यायाम करावेत.
 8. टेस्ट केल्यावर 14 दिवस विलगीकरणात राहावे.’
 9. ऑक्सिजन लेव्हलवर लक्ष ठेवावे. मास्क वापरावा.
 10. ताप, जास्त खोकला आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply