Take a fresh look at your lifestyle.

पूनावाला धमकी प्रकरण : शेलारांच्या गौप्यस्फोटावर कॉंग्रेसच्या सावंतांनी दिलेय ‘हे’ प्रत्युत्तर

मुंबई :

Advertisement

भाजप नेते आशिष शेलार यांनी सीरमच्या आदर पूनावाला यांच्या प्रकरणात गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. पूनावाला यांनी कोणाचेही नाव न घेतल्याने धमकी देणारे कोण, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक राजकीय कार्यकर्ते एकमेकांवर संशय व्यक्त करीत आहेत. त्याचवेळी शेळी यांनी कोणत्याही स्थानिक पक्षाचा या प्रकरणात हात असेल तर हे प्रकरण गंभीर आहे. सदर प्रकरणाबाबत आमच्याकडे काही माहिती उपलब्ध आहे. योग्य वेळ येताच ती सर्वांसरमोर आणली जाईल, तेव्हा यामध्ये ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार रहावं असा इशारा दिला आहे.

Advertisement

त्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने हेच प्रश्न विचारले असतानाही शेलार  यांनी भाजपा ची मुजोरपणा ची परंपरा कायम राखली. भाजपा हा टवाळखोरांचा पक्ष आहे हे स्पष्ट आहेच. त्यामुळे कालाकांडी वगैरे भाषाही त्यांनाच शोभू जाणे. भाजपा नेत्यांनी कितीही टवाळखोरी केली तरी काँग्रेस जनतेचा आवाज उचलत राहील. याला केवळ भाजपा ची मुजोरी, अकार्यक्षमता व अज्ञान जबाबदार आहे.  नाना पटोले  यांनी अदार पुनावाला यांच्या तक्रारीवरून सवाल केला. लसीकरणाबाबत मोदी सरकारच्या नियोजनशून्यतेवर बोट ठेवले. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केंद्राने रेमडेसिवीर व लसींची निर्यात का केली हा प्रश्न उपस्थित केला.

Advertisement

पुढे त्यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले आहे की, भाजपाचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ अशी परिस्थिती आहे. जो यांना आरसा दाखवतो त्याच्यावर गलिच्छ भाषेत टिका केली जाते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी, मनमोहन सिंहजी व राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या चुका दाखवण्याचा, सल्ला देण्याचा प्रयत्न केला त्यावर लगेच…

Advertisement

Sachin Sawant सचिन सावंत on Twitter: “सर्वोच्च न्यायालयाने हेच प्रश्न विचारले असतानाही @ShelarAshish यांनी भाजपा ची मुजोरपणा ची परंपरा कायम राखली. भाजपा हा टवाळखोरांचा पक्ष आहे हे स्पष्ट आहेच. त्यामुळे कालाकांडी वगैरे भाषाही त्यांनाच शोभू जाणे. भाजपा नेत्यांनी कितीही टवाळखोरी केली तरी काँग्रेस जनतेचा आवाज उचलत राहील.” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply