Take a fresh look at your lifestyle.

पोपटासह फोटो शेअर करून अमृता फडणवीस यांनी दिलाय ‘तो’ महत्वाचा संदेश

पुणे :

Advertisement

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची एक वेगळी ओळख आहे. बँकर आणि गायिका म्हणून त्यांनी आपली ओळख प्रस्थापित करतानाच मुक्त विचारांच्या महिला म्हणूनही महाराष्ट्र त्यांना ओळखतो. आताही त्यांनी एक महत्वाचा संदेश देण्यासाठी पोपटासह फोटो शेअर केला आहे.

Advertisement

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर रंगीबेरंगी पोपट हातात घेऊन त्याच्याशी हितगुज करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यावर इंग्रजीत त्यांनी विचारही मांडला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या पक्षाने नुकतेच त्याच्या आभाळात उंच भरारी घेण्याचे गुपित माझ्याशी शेअर केले आहे. पोपट म्हणतोय की, आकाशात उंच भरारी घेण्यासाठी आणि या सकारात्मकतेसाठी तो उजव्या आणि दाव्या अशा दोन्ही पंखांचा योग्य आणि समतोल वापर करतो.

Advertisement

AMRUTA FADNAVIS on Twitter: “A birdie just told me his ‘fly high’ secret ! He said – he uses best of both #leftwing & #rightwing to soar high into the progressive skies ! #mondaythoughts #IdeaOfIndia https://t.co/75yg2H2ovp” / Twitter

Advertisement

मंडे थॉट म्हणून असे लिहिताना त्यांनी आयडिया ऑफ इंडिया हा शब्दही त्यासमवेत हॅशटॅग जोडलेला आहे. देशाच्या विकासासाठी डाव्या आणि उजव्या अश दोन्ही पंखांचा (विचारांचा) योग्य पद्धतीने वापर करावा लागेल असाच तर संदेश त्यांनी दिलेला नाही ना, असेही अनेकांना वाटत आहे. एकूणच विकासाची उंच भरारी घेण्यासाठी समतोल पद्धतीने डाव्या आणि उजव्या पंखांचा वापर कारणाचे अमृता फडणवीस यांनी सूचित केले आहे. मात्र, हा संदेश त्यांनी नेमका कोणत्या व्यक्ती किंवा संघटना व संस्थेसाठी दिलाय याबाबत स्पष्ट लिहिलेले नाही.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply