Take a fresh look at your lifestyle.

सिबिल चांगले असूनही ‘त्यामुळे’ नाही मिळू शकत कर्ज; पहा कोणती आहेत कारणे

मुंबई :

Advertisement

सिबिल स्कोअर (Cibil Score) चांगला असेल तर आपल्याला नक्कीच कर्ज मिळू शकते असे म्हटले जाते. मात्र, फ़क़्त तो स्कोअर चांगला असला म्हणजे आपल्याला नकीच कर्ज मिळेल असेही काहीच नाही. आज आपण कर्ज मिळण्याची पात्रता आणि इतर नियम व अटी याबाबतची माहिती पाहणार आहोत. क्रेडिट स्कोअर कर्जाचे एकमात्र स्केल नाही. क्रेडिट स्कोअर (credit score) चांगली असला तरीही आपण इतर निकष पूर्ण केले नाहीत तर कोणत्याही परिस्थितीत आपणास कर्ज मिळणार नाही.

Advertisement

वेतन : कर्ज देणारी बँक (Bank loans) अर्जदाराचा पगार किंवा मिळकत किती आहे हे तपासून पाहते. प्रत्येक बँकेचा निकष असा आहे की, या पगारामधील काही टक्के रक्कम हफ्ता म्हणून द्यावी लागते. त्यामुळे पगार कमी असल्यास कर्ज दिले जाणार नाही. जर तुमचा पगार बँकेच्या मानकांनुसार नसेल तर बँक तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत कर्ज देणार नाही.

Advertisement

वय : जर आपण 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे असल्यास बँक आपल्याला कर्ज देण्यास टाळाटाळ करते. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे 60 वर्षानंतर व्यक्ती सेवानिवृत्त होतो. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनची रक्कम खूपच कमी असते. म्हणूनच डिफॉल्टरची वाढ होण्याची शक्यता असते.

Advertisement

नोकरी : काहींना नोकरी जलद बदलण्याची सवय असते. एका संस्थेत जास्त कालावधीसाठी अशा व्यक्ती राहत नसतात. कर्ज मिळण्यास हीसुद्धा अडचण होऊ शकते. कारण इन्स्टंट जॉब कन्व्हर्टर व्यक्ती कमी विश्वासार्ह मानले जातात. यामुळे आपल्याला कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते.

Advertisement

आपण गॅरंटर असल्यास : एखाद्यास कर्ज घेण्यासाठी आपण कधीही हमीदाराची भूमिका बजावली असेल आणि आपल्या त्या कर्जदाराने परतफेडीचे पैसे देण्यासाठीची कार्यवाही केली नसेल तर आपण जबाबदार असतो. जर आपल्या मित्राने किंवा जोडीदाराने कर्ज वेळेत परतफेड केले नसेल तर आपल्याला कर्ज घेण्यास अडचणी येऊ शकतात.

Advertisement

आपण कोणत्या संस्थेत काम करीत आहात : कर्ज मिळविणे देखील आपण कोणत्या संस्थेत काम करत आहात यावर अवलंबून आहे. जर आपण एखाद्या ब्लॅक लिस्टेड किंवा लहान संस्थेत काम करत असाल, तर आपल्याला कर्ज मिळण्यास अडचणी येतील. दुसरीकडे, जर आपण एखादी मोठी एमएनसी किंवा मोठ्या संस्थेत काम करत असाल तर तुम्हाला कर्ज घेण्यास लवकर पात्र असू शकता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply