Take a fresh look at your lifestyle.

इंडिया लॉकडाऊनबद्दल मोदी सरकारचे आहे असे धोरण; पहा नेमके काय म्हटलेय अधिकाऱ्यांनी

मुंबई :

Advertisement

केंद्र सरकार देशभरात लॉकडाऊन लागू करू शकते का, असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. काही राजकीय कार्यकर्त्यांनी पाच राज्यातील निकाल लागला की, देशभरात लॉकडाऊन लागू होण्याचे म्हटल्याने अशी चर्चा चालू आहे. सोशल मीडियामध्ये याबद्दल प्रश्नही विचारले जात आहेत. तथापि, अशी कोणतीही योजना नसल्याचे केंद्र सरकारचे अधिकारी सांगत आहेत. आता असे केल्यास बेरोजगारी वाढण्याचा धोका केंद्रातील अधिकारी आणि मंत्र्यांना वाटत आहे.

Advertisement

हिंदुस्तान या माध्यम समूहाने याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे की देशभरात लॉकडाऊनसाठी केंद्र सरकारची कोणतीही योजना नाही. परंतु कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापल्या क्षेत्रात निर्बंध वाढविण्यास सांगितले आहे. देशभरात कोरोना संसर्ग फोफावत असल्याने अनेक राज्यांनी निर्बंध घातले आहेत. आतापर्यंत सुमारे 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना कर्फ्यू आणि लॉकडाउनसारखे निर्बंध लागू केले आहेत.

Advertisement

दरम्यान, कोरोनाचा पॉजिटिविटी रेट टक्क्यांहून अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य मंत्रालयाने कडक बंदोबस्ताचा सल्ला अगोदरच दिला आहे. आरोग्य मंत्रालय आणि कोरोना टास्क फोर्सच्या अधिकात्यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. कुंभमेळ्यातून परत आलेल्या लोकांमुळे कोरोना संसर्ग झाल्याची चर्चा सुरू आहे. रविवारीही देशात कोरोना संसर्गाची 3.62 लाख प्रकरणे आढळली आहेत. यापैकी 10 राज्यात केवळ 70 टक्के प्रकरणे आढळली आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply