Take a fresh look at your lifestyle.

सातपुतेंनी मिटकरींना म्हटलेय ‘बाजारू विचारवंत’; पहा नेमका काय आहे वाद

सोलापूर :

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांमध्ये शाब्दिक वाद पेटला होता. त्याचा निकाल भाजपच्या बाजूने लागला असून ज्येष्ठ नेते यावर आता व्यक्तिगतरीत्या असलेला शाब्दिक वाद विसरून कामालाही लागले आहेत. मात्र, या दोन्ही पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये मात्र, अजूनही हा वाद शमलेला नाही.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि सुप्रसिद्ध वक्ते अमोल मिटकरी यांच्यात आणि भाजपचे युवा आमदार राम सातपुते यांच्यात हा वाद अजूनही धगधगत आहे. आता आमदार सातपुते यांनी मिटकरी यांना थेट बाजारू विचारवंत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि खुद्द मिटकरी यावर कोणते उत्तर देतात, याकडे भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

विजय हा विजय असतो कितीही अर्ध नागडे होऊन बोंबलत बसलात तरी उपयोग नाही.प्रचारात भाषा नीट वापरायची असते तरच विजय होतो. प्रचारसभेतली पिसाळलेली भाषा बंद करा.पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेने तुमचं तोंड काळ केलं आहे ते पुसून घ्या नीट. पराभव पचवायच शिका, असे सातपुते यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Advertisement

(1) Ram Satpute on Twitter: “विजय हा विजय असतो कितीही अर्ध नागडे होऊन बोंबलत बसलात तरी उपयोग नाही.प्रचारात भाषा नीट वापरायची असते तरच विजय होतो. प्रचारसभेतली पिसाळलेली भाषा बंद करा.पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेने तुमचं तोंड काळ केलं आहे ते पुसून घ्या नीट. पराभव पचवायच शिका @amolmitkari22 #बाजारूविचारवंत” / Twitter

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply