Take a fresh look at your lifestyle.

Assembly Result 2021 : गड आला, पण सिंह गेला.. ममता दीदींच्या पराभवाची ‘ही’ आहेत कारणे!

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी एकहाती किल्ला लढविताना भाजपला अस्मान दाखविले. मात्र, त्यांच्या विजयाला तीट लागले. देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राम मतदार संघात ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत अखेर ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला.

Advertisement

विशेष म्हणजे, आधी ममता बॅनर्जी यांचा 1200 मतांनी विजय झाल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले होते. त्यामुळे तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु असतानाच दीदीचा1953 मतांनी पराभव झाल्याची बातमी आली. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये शुभेन्दू अधिकारी यांनी पराभव केला. ममता दीदींच्या पराभवाने तृणमूलची अवस्था ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी झाली.

Advertisement

ममता दीदी म्हणतात..
ममता बॅनर्जी यांनी हा पराभव स्वीकारताना असं म्हटलय, की नंदीग्राममधील लोकांनी दिलेला कौल मी स्वीकारते. आम्ही 221 हून अधिक जागा जिंकल्या आणि भाजप निवडणूक हरला आहे.

Advertisement

ममता दीदींच्या पराभवाची कारणे

Advertisement
  • नंदीग्राममध्ये सुरुवातीपासूनच ममता दीदी आणि अधिकारी यांच्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. आपला सुरक्षित भवानीपूर मतदारसंघ सोडून दीदी यांनी भाजपचे अधिकारी यांच्याविरुद्ध शड्डू ठोकले होते. नंदीग्राम मतदारसंघ हा अधिकारी यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथे अधिकारी यांना आव्हान देणे अवघड असल्याची जाणीव ममता बॅनर्जी यांनाही होती.
  • नंदीग्राममध्ये नंदीग्राम एक आणि नंदीग्राम दोन असे भाग पडतात. पहिल्या भागात शुभेन्दु अधिकारी आघाडीवर होते. दुसऱ्या भागातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर ममतादीदींनी आघाडी घेतली. मात्र, अखेर अधिकारी हेच वरचढ ठरले.
  • नंदीग्राममध्ये चुरशीने 88 टक्के मतदान झालं होतं. या मतदारसंघात मुस्लिम मते निर्णायक ठरली. विशेष म्हणजे, गेल्या निवडणूकीत शुभेन्दु अधिकारी हे ‘तृणमूल’चे उमेदवार होते. त्यावेळी त्यांनी डाव्या पक्षाच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.
  • सुरुवातीला भाजपच्या शुभेन्दु अधिकारी यांनी ममतांना पिछाडीवर टाकत मोठी आघाडी घेतली होती. नंतर काही वेळाने ममता दीदींनी पुन्हा कम बॅक करत 2700 मतांची आघाडी घेतली. पण ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. नंतर शुभेन्दु अधिकारी पुन्हा एकदा आघाडीवर गेले. नंदीग्राममधील मतमोजणीमुळे क्षणाक्षणाला अनेकांचा काळजाचा ठोका चुकत होता.

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply