Take a fresh look at your lifestyle.

‘जीएसटी’ पावला.. एप्रिलमध्ये विक्रमी वसुली, तुम्हीच पहा!

दिल्ली : कोरोनामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बसले. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल तर विचारायलाच नको. एकीकडे अशी दयनीय अवस्था असतानाही भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या गर्तेत अडकू पाहणाऱ्या अर्थव्यवस्थेने एप्रिल महिन्यात जबरदस्त कामगिरी केली. वस्तू आणि सेवा करातून (GST) आजवरचा सर्वाधिक महसूल (revenue) मिळाला आहे.

Advertisement

एप्रिलमधील जीएसटी कराच्या आकडवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. वस्तू आणि सेवा करातून सरकारला एप्रिल महिन्यात १,४१,३८४ कोटींचा महसूल मिळाला. सलग सातव्या महिन्यात ‘जीएसटी’ने एक लाख कोटींचा टप्पा पार केला. सरकारसाठी ही दिलासादायक बाब आहे. २०१७ मध्ये अंमलात आल्यानंतर एका महिन्यातील ‘जीएसटी’चे हे विक्रमी उत्पन्न आहे.

Advertisement

देशाचे अर्थचक्र सावरले असून, याआधी मार्च महिन्यात वस्तू आणि सेवा करातून सरकारला विक्रमी १.२४ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मागील सात महिने दरमहा एक लाख कोटीचे जीएसटी उत्पन्न मिळत असल्याने केंद्र सरकारला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. एप्रिल महिन्यात जीएसटी करातून १.४१ लाख कोटी महसूल मिळाला. मार्च महिन्याच्या तुलनेत कर संकलनात १४ टक्के वृद्धी झाली आहे. देशातील काही भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असले, तरी अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल सुरु आहे.

Advertisement

केंद्र सरकारने जीएसटी कर संकलनाचे एप्रिल महिन्यातील आकडेवारी जाहीर केली. त्यात ‘सीजीएसटी’मधून २७,८३७ कोटी, ‘एसजीएसटी’मधून ३५,६२१ कोटी, ‘आयजीएसटी’मधून ६८,४८१ कोटी आणि सेस (अधिभार) ९,४४५ कोटींचा कर मिळाल्याचे म्हटलं आहे.

Advertisement

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात ‘जीएसटी’मधून तब्बल १ लाख १३ हजार १४३ कोटीचे उत्पन्न मिळाले होते. जीएसटी महसुलाने ऑक्टोबरपासून सलग सातव्या महिन्यात एक लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, बनावट बिलांच्या माध्यमातून होणारी जीएसटी करचोरीच्या प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणांकडून छडा लावला जात आहे. गेल्या काही महिन्यात अशा प्रकारे हजारो कोटींचा जीएसटी बुडवणारी रॅकेट्स जीएसटी, इन्कम टॅक्स, कस्टम आयटी सेल यांनी उध्वस्त केली आहेत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply