Take a fresh look at your lifestyle.

तर राहुल गांधींना असेल G21 चे आव्हान; निवडणूक निकालावर ठरणार ‘त्यांचे’ धोरण

दिल्ली :

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एकूण कार्यपद्धतीवर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भाजपने त्यांची ठरवून बनवलेली ‘पप्पू’ ही प्रतिमा आणि त्यांचा सोज्वळ स्वभाव या त्यांच्याकडून पक्षासाठी अडथळे असल्याची भावना निर्माण झालेली आहे. त्याच G 21 गटाचे आजच्या मतमोजणी आणि निकालांकडे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

काँग्रेसच्या असंतुष्ट गटातील (G-21) गुलाम नबी आझाद यांच्यासारखे नेते पक्षाला नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे म्हणत आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. मात्र, या गटाची काही डाळ शिजली नाही. कारण, अशा पडत्या काळात नेतृत्व स्वीकारण्यासाठी इतर कोणीही उत्सुक नाही. त्यातच एखाद्याला अध्यक्ष पदावर नेमणूक दिली आणि इतरांनी गटबाजीतून पक्ष फोडला तर, अशीही भीती आहे. त्यामुळे शांत, संयमी, सोज्वळ आणि जनतेची भाषा बोलणाऱ्या राहुल गांधींना आव्हानं देऊनही बदल झालेला नाही.

Advertisement

मात्र, आजच्या निवडणूक निकालातून पक्षाला सकारात्मक निकाल दिसला नाही तर G 21 गटाला आणखी बळ मिळणार आहे. हा गट मग अशावेळी पक्षात बदलाची मागणी पुन्हा एकदा नेटाने रेटण्याची शक्यता आहे. त्यासाठीचे मुद्दे असे :

Advertisement
  1. राहुल गांधी केरळमध्ये अधिक सक्रिय असूनही बहुतेक एक्झिट पोल केरळमध्ये डाव्या आघाडीची सत्ता येऊ शकते असा अंदाज बांधत आहेत. त्यामुळे याची जबाबदारी थेट राहुल गांधी यांच्यावर येणार आहे.
  2. तामिळनाडूमध्ये काँग्रेस द्रमुक सोबत आहे जी सत्तेत परत येत असल्याचे दिसत आहे. तर, या विजयाचे श्रेय स्टालिन यांना जाईल. बंगालमध्ये कॉंग्रेस स्पर्धेतच नाही.
  3. आसाममध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकेल. मात्र, एक्झिट पोलमध्ये आसाममध्ये भाजपचा परडा जड ठरतोय. त्याचीही जबाबदारी राहुल गांधी यांनाच घ्यावी लागणार आहे.
  4. बंगालमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आणि तृणमूलला सरकार स्थापण्यासाठी डाव्या-काँग्रेसची गरज भासू शकते. अशावेळी पक्षाची काय भूमिका असणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष असेल.
  5. भाजप पुन्हा एकदा राहुलवर अपयशी आणि कमकुवत नेता म्हणून हल्ला करण्याची शक्यता आहे. त्याला काँग्रेस कसे प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

संपादन : संतोष शिंदे  

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply