Take a fresh look at your lifestyle.

Assembly Result 2021 : दीदींच्या बंगालमध्ये पहा नेमका काय आहे निकालाचा रोख; रात्री 9.15 ची आकडेवारी

दिल्ली :

Advertisement

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग बंगाली मतदारांनी खुला केला आहे. मागील निवडणुकीपेक्षा दणक्यात यश मिळवत ममता दीदी सत्तेत येत आहेत. तर, केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपने डावी आघाडी आणि काँग्रेस यांचा दणक्यात पराभव करून दणक्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान पक्के केले आहे.

Advertisement

रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत प्रसिद्ध झालेले निकाल आणि आघाडीच्या जागा अशा :

Advertisement
राजकीय पक्षआघाडीविजयएकूण
तृणमूल काँग्रेस84135219
भाजप373471
CPM  202

अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान करताना भाजपला मोठ्या जागा मतदारांनी दिलेल्या आहेत. मात्र, तरीही 200 पेक्षा अधिक जागांवर डोळा असलेल्या या केंद्रातील सत्ताधारी पक्षाला मतदारांनी अपेक्षित यश मिळून दिलेले नाही. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बंगालमधून मतदारांनी हद्दपार केले आहे. तर, ममता दीदी यांच्यावर आणखी विश्वास टाकून त्यांना जास्त आमदार निवडणूक दिले आहेत. मात्र, नंदीग्राम येथून ममता दीदी यांचा धक्कादायक पराभव झाल्याने तृणमूल पक्षाला मोठा झटकाही बसला आहे.

Advertisement

2016 च्या विधानसभा निवडणुकीतील आमदारसंख्या अशी : तृणमूल 211, भाजप 3, सीपीएम 26 आणि काँग्रेस 44.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply