Take a fresh look at your lifestyle.

Assembly Result 2021 : दीदींच्या जय-पराजयानंतर पहा कोणी काय म्हटलेय ते..

पुणे :

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाला दणक्यात विजय मिळाला असला, तरी गड आला पण.. अशीच परिस्थिती झाली आहे. कारण, राज्यात 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याच्या मार्गावर असलेल्या या पक्षाच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. त्यामुळे अनेकांनी सोशल मिडीयामध्ये दीदींच्या जय-पराजयाबद्दल भावना व्यक्त केली आहे.

Advertisement

अहमदनगर येथील निवेदक आणि सोशल मिडीयामध्ये सक्रीय असलेल्या उद्धव काळापहाड यांनी म्हटले आहे की, ममता दिदींना पायच दाखवायचे असतील तर त्यांनी बरमुडा घालुन फिरावं ” अशी एकदमच खालच्या पातळीची टीका असंस्कृत विरोधकांनी केली. ओ दिदी ओ दिदी म्हणून दिदींना हिनवलं. भरकटलेल्या समूहाच्या टाळ्या आणि हसू मिळवलं… पश्चिम बंगाल मधला ममता दिदींच्या पक्षाचा झालेला विजय हा ‘#महिलांचा_सन्मान_करायला_शिका‘ हे सांगणारा होता असं मला वाटतं. त्यांचा वैयक्तिक झालेला पराभव हा त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांकडून झालाय. ममता दीदींनी मतदारसंघ बदलून उभे राहिल्याने त्यांचा पराभव झाला असला तरी राज्य मात्र त्यांनी राखले आहे याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.

Advertisement

तर, आशिष साबळे पाटील (पुणे शहर सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी लिहिले आहे की, हाथ आया लेकीन मुहं ना लगा ! आज सकाळपासून नजर लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल निवडणूकीच्या सुरुवातीच्या आकडेवारीत भारतीय जनता पक्षाने ज्या प्रमाणे आघाडी घेतली होती (१००+) ते पाहता खूप चुरशीची लढाई पाहायला मिळत होती पण दुपारच्या सुमारास ज्या प्रमाणे TMC पक्षाने मुसंडी मारत सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेसाठी दावा आता जवळजवळ निश्चित केला आहे. स्वतः पंतप्रधान, गृहमंत्री, अमाप पैसा तसेच अनेक दिग्गज नेते प्रचारात उतरुन सुध्दा ‘भाजपा २०० पार’ काही होऊ शकले नाहीये ही वस्तुस्थिती पक्षाने स्विकारली पाहिजे. जमेची बाब येवढीच की २०१६ च्या निवडणुकीतील ३ जागा होत्या त्या २०२१ मधे ८० च्या आसपास गेल्या आहेत. काँग्रेस, डावे यांचा तर या निवडणुकीत सुपडा साफ झाल्याचे दिसून आले आहे. अजून पण बंगालमधे ममता लाट कायम आहे हे सिध्द झालयं.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply