Take a fresh look at your lifestyle.

Assembly Result 2021 : ‘त्या’ डावात फसली मोदी-शाहांची भाजप; पहा नेमका काय होता प्लॅन

दिल्ली :

Advertisement

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखणे हेच एकमेव आव्हन घेऊन डाव्या आघाडीने काही खास प्लॅन केला होता. त्यातच करोना काळात मोकाटपणे सभा घेऊन पक्षाला जिंकण्यासाठी जीवाचे रान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह फसले आहेत. यामुळे डाव्या आघाडीला राजकीयदृष्ट्या अपयश मिळाले असले तरी वैचारिकदृष्ट्या मोठे यश मिळाल्याचे दिसते.

Advertisement

विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये डाव्यांचा पुन्हा विजय आणि बंगालमधील भाजपाचा पराभव ही कम्युनिस्ट पक्षाची खास योजना होती. डावे पक्ष त्यात यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे बंगालमध्ये पक्षाचा सुपडासाफ होऊनही डाव्या आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. सीपीएमचे ज्येष्ठ नेते सुनीत चोप्रा यांनी ममता बॅनर्जी यांच्या विजयामुळे किंवा भाजपाच्या पराभवामुळे आनंदी असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

देशात उजवे, डावे आणि मध्यममार्गी असे तीन गट आहेत. त्यातील उजव्या गटात भाजप, मुस्लीम लीग, एमआयएम असे पक्ष आहेत. तर, डावीकडे कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी आहेत. तर, काँग्रेस आणि समविचारी पक्ष मध्यममार्गी आहेत. त्यातील डावे, भाजप आणि काँग्रेस हे आपापल्या विचारांवर ठाम आहेत. त्यांनी आपापले मतदार बांधले आहेत. त्यातील डाव्यांनी उजव्यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि इतर मध्यममार्गी पक्षांना मदत केली आहे. त्याच डावामध्ये सध्या भाजप अडकला आहे. त्यामुळे डाव्यांनी या निकालाचे स्वागत केले आहे.

Advertisement

चोप्रा यांच्यासह माकपचे नेते अतुलकुमार अंजानही केरळमधील डाव्यांच्या विजयापेक्षा बंगालमध्ये भाजपच्या पराभवाच्या शक्यतेवर समाधानी दिसले आहेत. जेव्हा पत्रकार सुनीत चोपडा त्यांना यांना म्हणाले की, तुम्ही बंगालमध्ये दहा वर्षापूर्वी जिथे सरकार चालवत होता त्या पक्षाविषयी तुम्ही का बोलत नाही आणि आता कॉंग्रेसशी युती करूनही तुम्हाला दोनअंकी जागा मिळताना दिसत नाहीत.  सुनीत चोप्रा यांनी सांगितले की, धोरण असे होते की, केरळ जिंकून बंगालमध्ये भाजपला पराभूत करायचे होते. आम्ही या दोन्ही गोष्टी यशस्वीरित्या केल्या आहेत.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply