Take a fresh look at your lifestyle.

Assembly Result 2021 : म्हणून मोदींना मिळाले नाही अपेक्षित यश; पहा नेमके काय म्हटलेय प्रशांत किशोर यांनी

दिल्ली :

Advertisement

पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या भव्य विजयाचे शिल्पकार आणि रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पार्टी 100 जागांपासून दूर राहूनही आपली सर्व्हिस सोडण्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर प्रशांत किशोर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय आहेत आणि यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाला 37-38 टक्के मतदान मिळाले. येथे इतकी मते मिळूनही विजय मिळवता आला नाही कारण, बंगालमध्ये जिंकण्यासाठी 45 टक्के मते आवश्यक आहेत. टीएमसीसमोर भाजपला पराभवाचा सामना का करावा लागला हेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

आज तक चॅनलच्या मुलाखतीत जेव्हा त्यांना विचारले गेले की भाजपाच्या पराभवाची कारणे कोणती, त्यावर प्रशांत किशोर म्हणाले की, एखाद्याचा विजय आणि पराभव हे अनेक कारणांच्या मिश्रणाची जोड असते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मॉडेलला पुढे करून भाजपने विधानसभा निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु 2019 ते 2021 दरम्यान त्यांनी (सरकार आणि टीएमसीमधील) योग्य तो बदल करण्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच त्याचे नुकसान झाले.

Advertisement

टीएमसीच्या विजयाच्या कारणाचे विश्लेषण करताना प्रशांत किशोर म्हणाले की, टीएमसीने गेल्या वर्षभरात भाजपाची ताकद, कमकुवतपणा, प्रचार, कार्यशैली काळजीपूर्वक पाहिली आणि त्यानुसार धोरण ठरविले. म्हणून टीएमसी हा पक्ष जिंकला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला गांभीर्याने घेतले नसल्याने त्यावेळी ‘तृणमूल’ला थोडासा धक्का बसला होता. मोदीजी खूप लोकप्रिय आहेत आणि त्यामुळे त्यांना चांगले मतदान मिळाले.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply