Take a fresh look at your lifestyle.

Assembly Result 2021 : डाव्या आघाडीला मोठे यश; दोन्ही राज्यातील प्लॅन ठरलाय की यशस्वी?

दिल्ली :

Advertisement

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीने केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात असलेल्या पक्षांना नवा आशेचा किरण मिळाला आहे. आसाम आणि पुडुचेरी यामध्ये भाजप आघाडीवर असतानाच तीन मोठ्या राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यातच दोन राज्यामध्ये आपला वेगवेगळा प्लॅन केलेल्या डाव्या आघाडीला या निवडणुकीत यश मिळाल्याची चर्चा आहे.

Advertisement

सध्या देशात उजवे विरुद्ध डावे + मध्यममार्गी असे चित्र आहे. त्यात उजव्या बाजूने भाजप, मुस्लीम लीग, एमआयएम असे पक्ष आहेत. तर, डाव्या बाजूने कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी आहेत. तर, मधल्या फळीत काँग्रेस आणि समविचारी पक्ष आहेत. त्यामध्ये डाव्या आघाडीने आता भाजप आणि उजव्यांना सत्तेत येऊ न देण्यासाठी काही ठिकाणी मध्यममार्गी मंडळींना मदतीचा हात दिला आहे. असाच खेळ त्यांनी केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये खेळण्याची चर्चा आहे.

Advertisement

केरळमध्ये डावे आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढत असतानाच बंगालमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रित आलेले आहेत. त्याचवेळी केरळात दोन्ही पक्ष सत्तेसाठी लढत असताना बंगालमध्ये त्यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाला आतून मदत केल्याची चर्चा आहे. त्यानुसार असे असल्यास डाव्यांचा या दोन्ही राज्यातील प्लॅन यशस्वी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. केरळमध्ये दावे मोठ्या मताधिक्याने पुन्हा सत्तेत येत असतानाच बंगालमध्ये मात्र या खेळात दावे नेस्तनाबूत झालेले आहेत. त्यानुसार त्यांना यातूनही संमिश्र यश मिळाल्याचे दिसत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply