Take a fresh look at your lifestyle.

‘एअर इंडिया’चा लिलाव, ‘टाटा’ आणि ‘स्पाईस जेट’मध्ये ‘फाईट’, कोण होईल मालक?

नवी दिल्ली : एअर इंडिया.. सरकारी विमान कंपनी. सातत्याने तोट्यात.. त्यामुळे वैतागलेल्या केंद्र सरकारने तिचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. कंपनीतील आपला शंभर टक्के हिस्सा सरकार विकणार आहे. सध्या ‘एअर इंडिया’ला (Air India) उत्पन्न मिळत असलं, तरी दिवसाला 20 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. आतापर्यंत कंपनीवर 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. 2007 मध्ये ‘इंडियन एअरलाईन्स’मध्ये (Indian Airlines) विलीन झाल्यापासूनच ‘एअर इंडिया’ तोट्यातच आहे.

Advertisement

तब्बल 88 वर्षांपूर्वी जे. आर. डी. टाटा यांच्या नेतृत्वाखाली ‘टाटा समूहा’नं ‘एअर इंडिया’ची स्थापना केली. त्यामुळं ‘एअर इंडिया’सोबत ‘टाटा’चे एक वेगळी नाळ जुळलेली असून, ही कंपनी पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी टाटा समूह (Tata Group) उत्सुक आहे. त्याकरता बोली (Bid) लावण्यातही त्यांनी आघाडी घेतली आहे. ‘स्पाईसजेट’चे (Spicejet) प्रवर्तक अजय सिंह यांनी लावलेल्या बोलीपेक्षा टाटा समूहाची ‘होल्डिंग’ कंपनी टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडनं अधिक किमतीची बोली लावली आहे. त्यामुळं लवकरच ‘एअर इंडिया’ची सूत्रे टाटा समूहाकडे जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

एअर इंडियाची (Air India) निर्गुंतवणूक प्रक्रिया (Disinvestment Process) वेगानं पूर्ण करून या वर्षाखेर तिची सूत्रे खासगी कंपनीकडे सोपवण्याची सरकारची इच्छा आहे. सध्या देशभर फैलावलेल्या कोविडच्या दुसर्‍या लाटेमुळे (Covid-19 Second Wave) विमान प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे ‘एअर इंडिया’चा पाय आणखी खोलात गेला असून, उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळं तिचं मूल्यांकनही कमी झालं आहे.

Advertisement

निर्गुंतवणुक प्रक्रियास विलंब
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांच्या माहितीनुसार, कोविडमुळे बोली लावणाऱ्या कंपन्यांकडून प्रत्यक्ष मूल्यांकन लवकर होण्याची शक्यता कमी आहे. यामुळं ‘एअर इंडिया’ची निर्गुंतवणुक प्रक्रिया पूर्ण होण्यास काही महिन्यांचा विलंब होऊ शकतो. ‘मिंट इंडिया इन्व्हेस्टमेंट समिट’मध्ये ते म्हणाले, की आर्थिक वर्ष 2021च्या पहिल्या सहामाहीत ‘एअर इंडिया’चे विभाजन पूर्ण करण्याचे सरकारचं उद्दिष्ट आहे. मात्र, सद्यस्थितीत थोडा उशीर होऊ शकतो. ‘एअर इंडिया’ची निर्गुंतवणूक प्रक्रिया मे किंवा जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply