Take a fresh look at your lifestyle.

आणि पवारांच्या ‘बारामती अॅग्रो’ने केली ‘ही’ महत्वाची मदत; पहा कोविड सेंटरला काय दिलेय त्यांनी

अहमदनगर :

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची कंपनी असलेल्या  ‘बारामती अॅग्रो’ची ओळख एक शेतकरीभिमुख संस्था म्हणून आहे. पोल्ट्री आणि साखर उद्योगासह कृषी प्रक्रिया क्षेत्रातील हा एक मोठा ब्रांड आहे. याच कंपनीने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील कोविड सेंटरला ऑक्सिजन बनवणारे यंत्र दिले आहेत.

Advertisement

Rohit Pawar on Twitter: “#OxygenConcentrator ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं त्यांचा तुटवडा निर्माण झाला. मात्र अशा परिस्थितीत नाशिक येथील व्यावसायिक राहुल ईघे जी यांनी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मिळवून देण्यासाठी मोठं सहकार्य केल्याने ते आपल्या लवकर मिळू शकले. याबाबत त्यांचे आभार! https://t.co/kT0n2oych0” / Twitter

Advertisement

सध्या करोनाच्या कालावधीत प्राणवायू ही एक महत्वाची आणि मागणी असलेली गोष्ट बनली आहे. मेडिकल ऑक्सिजनअभावी देशभरात अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. अशावेळी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना ऑक्सिजनचा नियमितपणे पुरवठा ठेवण्यासाठी रोहित पवार यांनी प्रत्येक कोविड सेंटरला 50 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर दिले आहेत. बारामती अॅग्रो कंपनीने यासाठी खर्च केलेला आहे.

Advertisement

रोहित पवारांनी याबाबत ट्विटरवर म्हटले आहे की, सध्या ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने ही बाब लक्षात घेऊन ‘बारामती ऍग्रो’च्यावतीने माझ्या मतदारसंघात जामखेड आणि कर्जत येथील कोविड सेंटरमध्ये प्रत्येकी ५० #OxygenConcentrator दिले. यामुळं तेथील रुग्णांची गैरसोय होणार नाही. मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं त्यांचा तुटवडा निर्माण झाला. मात्र अशा परिस्थितीत नाशिक येथील व्यावसायिक राहुल ईघे जी यांनी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मिळवून देण्यासाठी मोठं सहकार्य केल्याने ते आपल्या लवकर मिळू शकले. याबाबत त्यांचे आभार!

Advertisement

आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, अडचणीच्या प्रसंगी नेहमीच धावून येणाऱ्या ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर’ (MCCIA) ने माझ्या मतदारसंघातील कोविड सेंटरसाठी २० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची मदत केली. यामुळं इथल्या रुग्णांची ऑक्सिजनची सोय होईल. याबाबत मी MCCIA चा आभारी आहे!

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply