Take a fresh look at your lifestyle.

म्हणून करोना प्रोटोकॉल बासनात; मतमोजणीदरम्यान नेते-समर्थकांचा गोंधळ चालू

दिल्ली :

Advertisement

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसह उत्तरप्रदेश राज्यातील पंचायत निवडणुका, पोटनिवडणूक आणि महापालिका निवडणुकीच्या प्रचारामुळे देशभरात करोना बॉंब फुटला आहे. प्रचार करणाऱ्या नेत्यांनी याची कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही. त्यातच मतमोजणीच्या वेळी राजकीय उत्साह आणि विरोधकांवर कुरघोडी करण्याच्या विचारांनी करोना प्रोटोकॉल मागे पडला आहे. याचे पालन करण्याचे आदेश असतानाही अनेक ठिकाणी या नियमांना बासनात गुंडाळले गेले आहे.

Advertisement

उत्तरप्रदेश राज्यातील निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी भांडण झालेले होते. येथील मतमोजणी त्यामुळेच किमान दोन महिने पुढे ढकलून करोनावर मात करण्याला प्राधान्य देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र, त्याचा काहीही फरक निवडणूक आयोगावर झाला नाही.ल अखेर या राज्यात मतमोजणी सुरू झाली असून अनेक ठिकाणी गर्दीने आपली ‘बेजबाबदारी’ दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. नेते आणि समर्थकांनी सर्व नियम बासनात गुंडाळण्याची तयारी केली आहे.

Advertisement

NBT Uttar Pradesh on Twitter: “लखनऊ में पंचायत चुनाव की काउंटिंग के दौरान टूटा कोरोना प्रोटोकॉल, मतगणना के दौरान नहीं दिख रही है सोशल डिस्टेंसिंग #UPPanchayatElection2021 https://t.co/3OCWax3ycC” / Twitter

Advertisement

या मतमोजणीसह विजयी उमेदवारांनी मिरवणुका काढण्यावर बंदी आहे. मात्र, मतमोजणी केंद्रावर जोरदार गर्दी झाल्याने अगोदरच करोना प्रोटोकॉलची हवा निघून गेली आहे. त्यामुळे आता दिवसभरात आणखी काय पाहायला मिळेल, या विचारांनी आरोग्य क्षेत्रातील मंडळी आणि नागरिकांना धस्स होत आहे. निवडणूक ही आरोग्याच्या प्रश्नापेक्षा मोठी मानली गेल्याने करोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भती व्यक्त होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply