Take a fresh look at your lifestyle.

पुनावालांच्या बातमीवर रोहित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; पहा नेमके काय आवाहन केलेय त्यांनी

पुणे :

Advertisement

सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावला यांना धमकीचे फोन येत असल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली आहे. हे फोन करणारे नेमके कोय, अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Advertisement

रोहित पवार यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, कोरोना रोखण्यात ‘सिरम’चे पूनावाला यांची भूमिका महत्त्वाची असताना काहीजण त्यांना धमक्या देत असल्याची बातमी धक्कादायक आहे. धमकी देणं हे शौर्य नसून अशा लोकांनी धमकी देण्यापेक्षा ‘सिरम’ आणि ‘भारत बायोटेक’ या कंपन्यांना बळ देऊन लस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत! याशिवाय पूनावाला यांना सुरक्षित वाटेल, असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारसह आपल्या सर्वांची आहे आणि देशाची जनताही त्यांच्यासोबत आहे.

Advertisement

Rohit Pawar on Twitter: “कोरोना रोखण्यात ‘सिरम’चे CEO @adarpoonawalla यांची भूमिका महत्त्वाची असताना काहीजण त्यांना धमक्या देत असल्याची बातमी धक्कादायक आहे. धमकी देणं हे शौर्य नसून अशा लोकांनी धमकी देण्यापेक्षा ‘सिरम’ आणि ‘भारत बायोटेक’ या कंपन्यांना बळ देऊन लस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत!” / Twitter

Advertisement

अशा पद्धतीने जनतेने अशा संकटाच्या कालावधीत पूनावाला यांना सहकार्य करून विश्वास देण्याचा महत्वाचा मुद्दा रोहित पवार यांनी म्हणाला आहे. पूनावाला यांनी लंडन येथील टाईम्स यूकेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, भारत देशातील काही ताकदवान नेते आणि व्यावसायिक फोन करुन धमकी देत असून त्यामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांचादेखील समावेश आहे. सर्वांकडून त्वरित कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply