Take a fresh look at your lifestyle.

एप्रिलमध्ये टाटा मोटर्सला झटका; पहा नेमके काय झालय कारण

मुंबई :

Advertisement

दिग्गज ऑटो सेक्टर कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने एप्रिल2021 चा विक्री अहवाल जाहीर केला आहे. देशातील या आघाडीच्या वाहन निर्माता कंपनीच्या वाहनांच्या विक्रीत मार्च 2021 च्या तुलनेत मागील महिन्यात तब्बल 41 टक्क्यांची घट नोंदली गेली आहे. करोना रुग्णसंख्या वाढ आणि बाजारातील अनिश्चित वातावरण याचा फटका अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांना बसल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

कंपनीने एप्रिल 2021 मध्ये भारतीय बाजारात एकूण 9,530 युनिट्सची विक्री केली. मार्च 2021 मध्ये कंपनीने भारतीय बाजारात 66,609 वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये टाटाची एकही वाहन विक्री झाली नव्हती. त्यावेळी कोरोना साथीचा धोका लक्षात घेता भारत सरकारने देशभरात टाळेबंदी लादल्याने असे झाले होते. यामुळे टाटा वाहनांचे उत्पादन व विक्री दोन्ही बंद पडले होते.

Advertisement

पॅसेंजर वाहन विक्री आकडे :

Advertisement
एप्रिल 2021 मधील विक्रीमार्च 2021 मधील विक्रीझालेली घट
25,095 यूनिट्स29,654 यूनिट्स15 %

व्यावसायिक वाहन विक्री आकडे :

Advertisement
एप्रिल 2021 मधील विक्रीमार्च 2021 मधील विक्रीझालेली घट
16,644 यूनिट्स40,609 यूनिट्स59 %

परदेशात निर्यात झालेली आकडेवारी :

Advertisement
एप्रिल 2021 मधील विक्रीमार्च 2021 मधील विक्रीझालेली घट
2209 यूनिट्स3654 यूनिट्स40 %

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply