Take a fresh look at your lifestyle.

पुनावाल्यांच्या बातमीने जगभरात खळबळ; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

देशात सध्या करोना रुग्णसंख्या वाढत असतानाच लस मिळण्यात अडचणी येत आहेत. तसेच औषधे आणि ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यातही अडचणी येत आहेत. अशावेळी कोविशिल्डचे उत्पादन करणार्‍या सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावला यांनी लंडन येथील टाईम्स यूकेला दिलेल्या एका मुलाखतीत केलेल्या आरोपांमुळे अवघ्या जगात खळबळ उडाली आहे.

Advertisement

सीरम ही लस उत्पादन करणारी एक महत्वाची कंपनी आहे. त्यांच्या सीईओ पूनावाला यांच्या बातमीने त्यामुळेच अवघ्या जगाचे लक्ष वेढलेले आहे. पूनावाला यांनी या बातमीमध्ये अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे भारतात राजकीयदृष्ट्या किती मोठा त्रास व्यावसायिक आणि सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे हेच पुन्हा एकदा जगजाहीर झालेले आहे. पूनावाला यांनी बातमीत कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, त्यामुळे असे धमकी देणारे कोण, याबाबत उलटसुलट चर्चेला उत आलेला आहे.

Advertisement

पूनावाला यांच्या मुलाखतीमधील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. भारत देशातील काही ताकदवान नेते आणि व्यावसायिक फोन करुन धमकी देतात
  2. कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्याची मागणी करताना अनेक मुख्यमंत्र्यांनीही धमक्या दिलेल्या आहेत
  3. भारत देशात लस पुरवण्याबाबत प्रचंड दबाव आहे
  4. लोक फोन कॉलवर लस दिली नाही तर बरे होणार नाही असे सांगतात
  5. या घटनांमुळे आम्ही आमची कामे योग्य प्रकारे करू शकत नसल्याची खंत

संपादन : विनोद सूर्यवंशी  

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply