Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसने घेतली महत्वाची भूमिका; भाजप प्रवक्त्यांसह न्यूज अँकरचीही होणार गोची..!

मुंबई :

Advertisement

कोणतीही निवडणूक असोत कोणत्याही पद्धतीने जिंकण्याची तयारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचाराने गाजलेल्या पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल आज प्रसिद्ध होतील. मतमोजणीचे आकडे आणि त्यावरील विश्लेषण ऐकायला भारतीय जनता करोना संकटातही आतुर आहे. अशावेळी भाजपचे प्रवक्ते आणि न्यूज अँकर यांची अनोखी आक्रमकता पाहण्याची संधी देशाला आहे. मात्र, काँग्रेस पक्षाने वेगळीच भूमिका घेऊन माध्यम समूह आणि भाजपची गोची केली आहे.

Advertisement

होय, करोना संकटात निवडणुकीपेक्षा जनतेचे आरोग्य जास्त महत्वाचे असल्याचे अगोदरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूचित केले होते. त्यांनी त्यासाठी निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात न करण्याची अनोखी घोषणा केली होती. आताही देशभरात प्रतिदिन 4 लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण नव्याने आढळत असताना काँग्रेस पक्षाने स्तुत्य अशी भूमिका घेऊन निवडणूक निकालाला विशेष महत्व न देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार कोणताही काँग्रेस नेता किंवा प्रवक्ता निवडणुकीच्या विश्लेषणात सहभागी होणार नसल्याची घोषणा करण्यात आलेली आहे.

Advertisement

Sachin Sawant सचिन सावंत on Twitter: “अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या आदेशानुसार महाराष्ट्रातही @INCMaharashtra चे प्रवक्ते उद्या वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांवर होणाऱ्या चर्चेत सहभागी होणार नाहीत. सद्यस्थितीत निवडणूक निकालांपेक्षा जनतेच्या होणाऱ्या भयावह हालांकडे लक्ष देणे गरजेचे आहे 🙏” / Twitter

Advertisement

निवडणूक आणि मतमोजणी व निकाल यांच्या निमित्ताने आरोग्याच्या प्रश्नावर पांघरून टाकू न देण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाने अशी वेगळी भूमिका घेतल्याचे म्हटले जात आहे. एकूणच तसाही भारतीय राजकारणात मागे पडत चाललेल्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत कोणत्या राज्यात कितपत संधी असेल हाही मुद्दा आहेच. मात्र, तरीही आरोग्याचा प्रश्न निकालापेक्षा महत्वाचा असल्याचा संदेश यानिमित्ताने काँग्रेस पक्षाने दिला आहे. भाजप समर्थकांनी यावर काँग्रेस पक्षाला चिमटे काढले आहेत. तर, अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply