Take a fresh look at your lifestyle.

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मिळतात दोन लाख रुपये, तुम्हाला माहितीय का ‘ही’ योजना?

पुणे :

Advertisement

देशभर कोरोनाचा कहर सुरु आहे. मृत्यूच्या संख्येचा रोज नवनवा विक्रम होत आहे. कोरोनाने कुणाच्या घरातील आई गेली, तर कुणाचा भाऊ, बहीण, पती, पत्नी, तर कुणी तरुण मुलगा गमावला. घरातील कर्ता गमावल्याने काही कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र, घाबरू नका.. एक शासकीय विमा योजना (insurance policy) अशी आहे, की जिथे तुम्हाला 2 लाख रुपयांची विमा रक्कम मिळेल. कोरोनामुळे तुमच्या घरातील कोणी सदस्य गमावला असल्यास कुटुंबातील इतर सदस्य 2 लाख रुपयांवर दावा करू शकतात. चला तर मग ही काय योजना आहे, त्याचा लाभ कोणाला मिळू शकतो, त्यासाठी काय करायला लागते, याबाबत समजून घेऊ या..

Advertisement

घरातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंब उघड्यावर येऊ नये, देशातील प्रत्येक व्यक्तीला जीवनविम्याचा (jivan bima) लाभ देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 9 मे 2015 रोजी पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना (PMJJBY) सुरू केली. ही एक प्रकारची मुदत विमा योजना आहे. त्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. यामध्ये 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्तीला 2 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळते. त्यासाठी त्याला वर्षाकाठी 330 रुपये प्रीमियम (premium) भरावा लागतो. कोणत्याही बँकेचा खातेदार या विमा योजनेत गुंतवणूक करू शकतो.

Advertisement

कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास PMJJBY मध्ये विमाधारकास विमा संरक्षण मिळते. अर्थात त्यात कोविडपासून मृत्यू झालेल्यांचादेखील समावेश आहे. एखादी व्यक्ती आजाराने मृत्युमुखी पडली किंवा त्याने आत्महत्या केली, तरीही विमा संरक्षण मिळते. ‘बँकबाजार डॉट कॉम’चे (Bankbajar.com) मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी यांच्या मते, विमा खरेदी झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्यास, किमान 45 दिवसांनी PMJJBY मधील विमा संरक्षण हप्त्याचा दावा स्वीकारला जातो. मात्र, अपघातात मृत्यू झाला, तर ही अट लागू होत नाही.

Advertisement

दावा कसा कराल?
PMJJBY ही एक वार्षिक टर्म पॉलिसी आहे, ज्यात 1 जून ते 31 मेदरम्यान विमा संरक्षण दिले जाते. अशा परिस्थितीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीकडे या विमा पॉलिसीसाठी 2020-21 आर्थिक वर्षात पूर्ण प्रीमियम असणे आवश्यक आहे, तरच त्या व्यक्तीच्या नामनिर्देशित व्यक्ती विमा संरक्षणासाठी दावा करू शकते.

Advertisement

आवश्यक कागदपत्रे
पीएमजेजेबीवाय अंतर्गत नामित व्यक्तीने विमाधारकाच्या मृत्यूनंतर 30 दिवसांच्या आत दावा सादर करावा लागतो. मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यूचे कारण यासारखी कागदपत्रे गोळा करण्यास 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. अशा वेळी नामनिर्देशित व्यक्तीला पीएमजेजेबीवाय योजना घेणाऱ्या बँकेच्या संपर्कात राहावे लागेल. विमा संरक्षणासाठी दावा सादर करताना, उमेदवाराला योग्यरित्या भरलेला दावा फॉर्म, मृत्यूचे प्रमाणपत्र, रुग्णालयातून रजा पावती आणि रद्दबातल तपासणी, यांसारख्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. बँकेची कागदपत्रे स्वीकारल्यानंतर ते संबंधित विमा कंपनीकडे दावा 30 दिवसांच्या आत पूर्ण करण्यासाठी पाठवतात.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement
1 Comment

Leave a Reply