Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊनची कमाल, ‘अमेझॉन’ मालामाल; पहा किती कमावले?

मुंबई :

Advertisement

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Pandemic) थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन किंवा संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. परिणामी नागरिकांना घरातच ‘लॉक’ झाले आहेत. त्यामुळे अनेकांना शॉपिंगची हौस गुंडाळून ठेवावी लागली होती. बर्‍याच लोकांनी ऑनलाईन खरेदी (Online Shopping) सुरू केली. त्यामुळे दुकानाचं दिवाळं निघाले असले, तरी ऑनलाइन दुकाने जोरात सुरु आहे. त्यांनी छप्परफ़ाड कमाई केली आहे. त्यापैकी एक महत्वाचे नाव आहे, अमेझॉन..!

Advertisement

ऑनलाइन शॉपिंगच्या निरंतर वाढीमुळे, ‘अमेझॉन’ या ई-कॉमर्स साईटने या तिमाहीत विक्रमी कमाई केली आहे. अमेझॉनच्या विक्रीत तब्बल 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेझॉनची विक्री (Amazon’s profit) 108.5 बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे.

Advertisement

मार्चच्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न वाढून कमाई 8.1 बिलियन डॉलर्सवर गेले आहे. 2020च्या पहिल्या तिमाहीत कंपनीची कमाई 2.5 बिलियन डॉलर्स होती. मागील गुरुवारी विस्तारित व्यापारात अमेझॉनचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. दुसर्‍या तिमाहीत (एप्रिल ते जून) 110 अब्ज डॉलर्सवरुन 116 अब्ज डॉलर्स इतक्या महसुलाची अपेक्षा असल्याचे ‘अ‍ॅमेझॉन’ने म्हटले आहे.

Advertisement

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे, की “प्राइम व्हिडिओला आता 10 वर्ष झाली आहेत. गेल्या वर्षी 175 मिलियनहून अधिक ‘प्राईम मेंबर्स’नी (prime members) ‘शोज’ आणि चित्रपट स्ट्रीम केले आहेत. प्राईम व्हिडीओच्या ‘स्ट्रीमिंग अवरमध्ये 70 टक्क्यांची वाढ झाली.

Advertisement

जगभरात सध्या 200 मिलियनहून अधिक ‘पेड प्राइम मेंबर्स’ (Paid prime membars) आहेत. अ‍ॅमेझॉनने सांगितले, की भारतात जानेवारी 2020 पर्यंत सुमारे 300,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकर्‍या दिल्या आहेत, तर 2025 पर्यंत ही कंपनी भारतात १० लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करेल.

Advertisement

कोविडविरुद्धच्या लढाईत योगदान
भारताच्या कोविड विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात फेसबुक, अॅपल, अमेझॉन, ओप्पो आणि व्हिवो यांसह अनेक कंपन्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेझॉन इंडियाने त्यांच्या वैश्विक स्त्रोतांद्वारे 100 वेंटिलेटर्स मिळवले आहेत. हे व्हेंटिलेटर्स देशात आयात केले जातील. विमानांद्वारे हे व्हेटिंलेटर्स भारतात दाखल होतील. पुढील दोन आठवड्यांमध्ये हे व्हेटिंलेटर्स भारतात पोहोचतील, अशी माहिती अमेझॉनकडून देण्यात आली.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply