Take a fresh look at your lifestyle.

‘होमलोन’ झालंय स्वस्त; घ्या की मग घर! पहा ‘एसबीआय’चा व्याजदर..

मुंबई : जीवनात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे आपलं हक्काचं घरटं.. त्यासाठी प्रत्येक जण काडी काडी जमवतो. पण कितीही काही केलं, तरी घरासाठी पूर्ण रक्कम जमविणे अशक्य असतं. अशा वेळी आपल्या मदतीला येतात, त्या बँका. गृह कर्जाच्या (home loan) माध्यमातून आपलं सुंदर स्वप्न साकार करता येते. तुम्हीही घराचं स्वप्न पाहत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. कारण भारतीय स्टेट बँकेने (state bank of India) गृह कर्जदरात कपात केली आहे. व्याजदर कमी झाल्याने घर खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांचे गृहस्वप्न आवाक्यात आले आहे.

Advertisement

गृहकर्जाच्या बाजारपेठेत ‘एसबीआय’ (SBI) आघाडीवर आहे. त्यामुळे ग्राहकांना घर खरेदीसाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने बँकेने गृह कर्जदरात कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षक व्याजदर उपलब्ध होईल. तसेच मासिक हप्त्याचा भारदेखील कमी होणार आहे.

Advertisement

पंतप्रधान आवास योजना (PMAY) अनुदानावर प्रक्रिया करण्यासाठी ‘सेंट्रल नोडल एजन्सी’ (सीएनए) म्हणून गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने नेमलेली ‘एसबीआय’ ही एकमेव बँक आहे. ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ या उपक्रमासाठी ‘पीएमएवाय’अंतर्गत गृहकर्जांचे प्रमाण ‘एसबीआय’ वाढवीत आहे. डिसेंबर २०२० बॅंकेने १,९४,५८२ गृहकर्जे मंजूर केली आहेत.

Advertisement

याआधी ‘एसबीआय’ने एप्रिल महिन्यात गृहकर्ज दर पूर्ववत केले होते. त्यामुळे गृहकर्जाचा किमान व्याजदर ६.९५ टक्के होता, आता तो ६.७० टक्के करण्यात आला आहे. गृहकर्ज विभागामध्ये आपले नेतृत्व अबाधित राखत भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) गृहकर्जांच्या व्यवसायात ५ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. २०२४ पर्यंत ७ लाख कोटी रुपयांच्या गृह कर्ज वितरणाचे बँकेचे उद्दिष्ट आहे.

Advertisement

वार्षिक ६.८० टक्के इतक्या कमी व्याजदर आकारणाऱ्या ‘एसबीआय’ने गृहकर्ज विभागात ३४ टक्के इतका वाटा बाजारपेठेत मिळवला आहे. दररोज सुमारे १००० गृहकर्ज ग्राहकांना कर्ज प्रक्रियेत बॅंक सामील करून घेत आहे.
बँकेने ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर ६.७० टक्के इतका कमी केला आहे, तर ३० लाखांहून अधिक आणि ७५ लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर ६.९५ टक्के आणि ७५ लाखांवरील गृहकर्जावर ७.०५ टक्के कर्जदर केला आहे.

Advertisement

बँकेने महिला कर्जदारांसाठी ०.०५ टक्के सवलतदेखील जाहीर केली आहे. त्याशिवाय ‘योनो ऍप’ने (yono app) कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला ‘डिजिटल इन्सेन्टिव्ह’ (dijital insentive) म्हणून ०.०५ टक्के व्याजदर सवलत दिली जाईल, असे एसबीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply