Take a fresh look at your lifestyle.

नगरकरांसाठी महत्वाची बातमी; अखेर पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाची झालीय कार्यवाही

अहमदनगर :

Advertisement

शहरात प्रतिदिन किमान एक हजार रुग्णसंख्या नव्याने आढळत आहे. रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अहमदनगर महापालिका प्रशासनाने सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. त्यानुसार फ़क़्त औषध दुकाने आणि दुध सेवा चालू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल नगरमध्ये विक्रीसाठी न आणण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Advertisement

Sachin Mohan Chobhe (बातमीजीवी) on Twitter: “अहमदनगर शहरात दि. 3 ते 10 मे 2021 या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन..👍 https://t.co/niw5v7Telr” / Twitter

Advertisement

त्यामध्ये आयुक्त शंकर गोरे यांनी दिलेल्या सूचना आणि नियम असे :

Advertisement
  1. आरोग्य सुविधा सोडून  फक्त दूध विक्री सकाळी 7 ते 11 पर्यत  चालू असेल.  
  2. किराणा विक्री व भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. तरी कृपा करून शेतकऱ्यांनी नगर शहरामध्ये आपला शेतीमाल विक्रीत आणू नये अन्यथा मनपाच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल.
  3. नगर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या (दि. 3 मे 2021) रात्री बारा वाजल्यापासून ते 10 मेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

एकूणच नगर शहर आणि जिह्यातील वाढती रुग्णसंख्या हा गंभीर विषय बनल्याने प्रशासनाने खबरदारी घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यास सहकार्य करून ही करोना साखळी तोडण्याचे आवाहन सर्व स्तरामधून होत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतीच करोना आढावा बैठकीत असे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आता या शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply