Take a fresh look at your lifestyle.

अखेर अहमदनगरमध्ये झाला संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय; पहा नेमके काय चालू राहणार

अहमदनगर :

Advertisement

शहर आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्या एखाद्या मेट्रो सिटीलाही मागे टाकून झपाट्याने वाढत आहे. हीच करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अहमदनगर महापालिका प्रशासनाने सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. त्यानुसार फ़क़्त औषध दुकाने आणि दुध सेवा चालू राहणार आहे.

Advertisement

आयुक्त शंकर गोरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, नगर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या (दि. 3 मे 2021) रात्री बारा वाजल्यापासून ते 10 मेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

Advertisement

Sachin Mohan Chobhe (बातमीजीवी) on Twitter: “अहमदनगर शहरात दि. 3 ते 10 मे 2021 या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन..👍 https://t.co/niw5v7Telr” / Twitter

Advertisement

यामध्ये आरोग्य सुविधा सोडून  फक्त दूध विक्री सकाळी 7 ते 11 पर्यत  चालू असेल.  तसेच किराणा विक्री व भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. तरी कृपा करून शेतकऱ्यांनी नगर शहरामध्ये आपला शेतीमाल विक्रीत आणू नये अन्यथा मनपाच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा, गोरे यांनी दिला आहे.    

Advertisement

कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहराचे आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे  तसेच  कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी मार्केट यार्ड महात्मा फुले चौक येथे पाहणी केली. पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांनी यावेळी सांगितले की नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. कोणीही जॉगिंग साठी बाहेर पडू नये विनाकारण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply