Take a fresh look at your lifestyle.

क्रेडीट कार्ड घ्यायचे असल्यास वाचा ‘ही’ माहिती; कारण या’ आहेत बेस्ट सर्व्हिस देणाऱ्या बँका

मुंबई :

Advertisement

आजच्या काळात क्रेडिट कार्ड (Credit Card) ही एक गरज बनली आहे. प्रत्येकजण क्रेडिट कार्ड वापरतो किंवा वापरू इच्छितो. मात्र, ते प्रत्येकाला मिळतेच असेही नाही. मात्र, तरीही मिळत असल्यास ही माहिती वाचा आणि मगच कोणत्या बँकेचे कार्ड घ्याकॅहे हे ठरावा. प्रत्येक बँक आपल्या क्रेडिट कार्डमध्ये आपल्याला काही नवीन सेवा देण्याचे वचन देते. परंतु या नवीन सेवांसह अनेक प्रकारचे शुल्कही अपोआप येते. जे नंतर आपल्या चिंताग्रस्त करते. त्यामुळे आज आपण चांगल्या सेवा देणाऱ्या क्रेडीट कार्डच्या बँकांबाबत माहिती पाहणार आहोत.

Advertisement

एसबीआय (SBI / State Bank Of India) सिंपल क्लिक कार्ड : जे सर्वाधिक खरेदी करतात त्यांच्यासाठी हे एक परिपूर्ण कार्ड आहे. पहिल्या वर्षासाठी वार्षिक फी 499 रुपये आहे. तर या कार्डची वार्षिक रीएनुअल फीदेखील 499 रुपये आहे. जे वर्षाला 1 लाख रुपयांहून अधिक खरेदी करतात त्यांना 499 रुपये परतावा दिला जातो. हे कार्ड अमेझॉन बुक माय शो, क्लीयर ट्रिप, फूड पांडा, अर्बन क्लैप, झूम कार यावर खरेदी 10 प्‍वाइंट रिवार्डही देते. तसेच याच्या वेळोवेळी ऑफर्स चालू असतात.

Advertisement

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) प्लॅटिनम चिप क्रेडिट कार्ड : ज्यांना हे कार्ड वापरायचे आहे त्यांच्याकडे किमान 20000 रुपये त्यांच्या बँक खात्यात असले पाहिजेत. या कार्डासाठी तुम्हाला वार्षिक शुल्क भरावे लागत नाही. याशिवाय एचपीसीएल बँकेकडून पेट्रोल, डिझेल घेण्यावर अधिभारात तुम्हाला सूट मिळेल.

Advertisement

सिटीबँक (Citi Bank) कॅशबॅक क्रेडिट कार्ड : आपल्याकडे सिटीबँक क्रेडिट कार्ड असल्यास आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक वेळी आपण आपल्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास आपल्याला कॅशबॅक मिळेल. उदाहरणार्थ, आपल्याला चित्रपटाची तिकिटे, फोन बिले, उपयुक्तता बिलांवर 5% कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर रेस्टॉरंट्समध्ये वापरताना तुम्हाला 15 टक्के कॅशबॅक मिळेल.

Advertisement

एचडीएफसी (HDFC Bank) क्रेडिट कार्ड : या कार्डसाठी आपल्याला वार्षिक शुल्क म्हणून 2500 द्यावे लागतील. परंतु जर आपण पहिल्या 90 दिवसांत 40,000 वापरत असाल तर आपल्याला हे शुल्क द्यावे लागणार नाही.

Advertisement

सिटीबँक क्रेडिट रिवार्डस कार्ड : हे क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला रिवार्डस मिळतील. वापरल्या गेलेल्या प्रत्येक 1225 रुपयांना तुम्हाला 10 बक्षीस गुण मिळतील. त्याच वेळी एकदा कार्ड सक्रिय झाल्यानंतर आपणास स्वतंत्रपणे 2500 बक्षीस गुण मिळतील. या कार्डासाठी तुम्हाला वार्षिक शुल्क भरावे लागत नाही.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply