Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक बातमी : ऑक्सिजन कंसंट्रेटरबाबत ही बातमी वाचली का? नसेल तर क्लिक करा की

पुणे :

Advertisement

सध्या देशभरात ऑक्सिजन हा एक हॉट मुद्दा बनला आहे. दिल्लीसह अनेक ठिकाणी प्राणवायूच्या अभावी अनेकांचा मृत्यू झालेला आहे. अशावेळी केंद्र सरकारने एक दिलासादायक बातमी दिली आहे. हा निर्णय घेण्यास भले उशीर झालेला असो. मात्र, आता उशिरा का होईना पण याबाबत एक महत्वाचा निर्णय झाला आहे.

Advertisement

ANI on Twitter: “Govt has included import of oxygen concentrators for personal use, through post, courier or e-commerce portals, in the list of exempted categories, where Customs clearance is sought as ”gifts”. This exemption is valid till 31 July 2021: Ministry of Commerce & Industry https://t.co/yEUFgPjTai” / Twitter

Advertisement

देशातील बर्‍याच भागात कोरोना संकटामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता वाढली आहे. एक पर्याय म्हणून अनेकजण आता ऑक्सिजन संकलन मशीनचा (Oxygen Concentrators) विचार करीत आहेत. परिणामी याची मागणीतही वाढली आहे. ही मागणी  आणि गरज लक्षात घेता केंद्र सरकारने पोस्ट, कुरिअर किंवा ई-कॉमर्स पोर्टलच्या माध्यमातून वैयक्तिक वापरासाठी परदेशातून ऑक्सिजन मशिनच्या पुरवठ्यास मान्यता दिली आहे.

Advertisement

वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार ही 31 जुलै 2021 पर्यंत याच्या करामध्ये सूट मिळाली आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार 1 हजार रुपयांहून अधिक किमतीची भेटवस्तू ही कस्टम ड्युटी आणि 28 टक्के जीएसटीमध्ये येते. ऑक्सिजन कंसंट्रेटर हे एक असे वैद्यकीय उपकरण आहे ज्याचा वापर केवळ घरातील विलगीकरण कशात आणि ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करीत असलेल्या रूग्णालयात केला जाऊ शकतो. याला आता आपण थेट भेटवस्तू म्हणून मागवू शकतो.

Advertisement

ऑक्सजीन कॉन्सेट्रेटर हे एक असे वैद्यकीय डिव्हाइस आहे जे आसपासच्या हवेपासून एकाच वेळी ऑक्सिजन गोळा करतो. पर्यावरणीय हवेमध्ये 78 टक्के नायट्रोजन आणि 21 टक्के ऑक्सिजन वायू असतो. दुसरा गॅस उर्वरित 1 टक्के आहे. ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर ही हवा आत घेतो, फिल्टर करतो, नायट्रोजन परत हवेत सोडतो आणि उरलेल्या ऑक्सिजनला रुग्णांना पुरवतो. असे हे खूप उपयोगी असलेले यंत्र सहजपणे वापरण्याची संधी आता सगळ्यांना यानिमित्ताने मिळाली आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply