Take a fresh look at your lifestyle.

ओय बल्ले.. बल्ले..; ‘तिथे’ चालू आहे ऑक्सिजन लंगरही; पहा कशी सुरु केलीय ही सेवा

पुणे :

Advertisement

एकीकडे उत्तरप्रदेश राज्याच्या आग्रा शहरात पोलिसांनी गरीबांचा ऑक्सिजन सिलिंडर हिसकावून घेऊन व्हीआयपी मंडळींना दिला आहे. दुसरीकडे दिल्लीत ऑक्सिजन न मिळाल्याने बत्रा हॉस्पिटलमध्ये तब्बल 8 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्र राज्यातही असेच दुर्दैवी चित्र आहे. त्याचवेळी उत्तरप्रदेश राज्यात कानपूरमध्ये चक्क ऑक्सिजन लंगर चालवला जात आहे.

Advertisement

शीख समुदायाची दानशूरता जगजाहीर आहे. सध्याच्या शेतकरी आंदोलनातही जगभरातील शीख समुदाय दातृत्वाच्या भावनेने मदत करीत आहेत. अहमदनगर शहरात याच समुदायातर्फे घर घर लंगर अशी जेवण देण्याची सेवा केली जात आहे. त्याचवेळी कानपूर शहरात गुरु सिंग सभा या संस्थेमार्फत चक्क ऑक्सिजन लंगर चालवला जात आहे. याद्वारे गरजू मंडळींना मोफत ऑक्सिजन सिलिंडर दिले जात आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “कानपुर में सिख समाज की फ्री ‘Oxygen लंगर’ सेवा, देर रात तक लगे वॉलंटियर्स ऐप में डाउनलोड और पढ़ने के लिए यहां क्लिक करें : https://t.co/22n5bwFust via @NavbharatTimes” / Twitter

Advertisement

संस्थेचे कुलवंत सिंग गिल यांनी म्हटले आहे की, अशाच पद्धतीने सध्या अनेक ठिकाणी मोफत ऑक्सिजन देण्याची सेवा करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक संस्थांनी देशभरात आपापल्या भागात यासाठी पुढाकार घेऊन नागरिकांना प्राणवायू देण्याची ही मोहीम पुढे न्यावी. एकूणच कानपूर शहरातील शीख समुदायाच्या संस्थेचा हा उपक्रम जगभरात चर्चेचा विषय बनला आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply