Take a fresh look at your lifestyle.

आहात ना तयार..; आणि म्हणून पेट्रोल-डीझेलचे भाव ‘इतके’ वाढू शकतात..!

मुंबई :

Advertisement

देशभरातील इलेक्शन फिव्हर आता कुठे कमी झाला आहे. त्यातच करोनाकहर जोमात आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारला पैशांची चणचण जाणवत असलेल्याने आता पेट्रोल आणि डीझेल या दोन्ही इंधनाची दरवाढ होण्याची शक्यता आहे. त्याबाबत आताच बातम्या येण्यास सुरू झालेल्या आहेत.

Advertisement

मागील दोन महिन्यांपासून तेल कंपन्यांनी (तेल विपणन कंपन्या) देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अजिबात वाढवलेल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही कच्च्या तेलाची किंमत 67  डॉलरच्या पातळीवर आहे. मात्र, पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर इंधन दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

दोन महिन्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. 27 फेब्रुवारीपासून तेलाचे दर बदललेले नाहीत. तथापि, तेलाच्या किंमती मेच्या पहिल्या महिन्यात वाढू शकतात, असे अनेकांना वाटत आहे. कारण, कृत्रिमरित्या तेलाचे दर कमी-जास्त करावेच लागणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकार यांना पैशाची गरज आहे. अशावेळी हे नुकसान भरुन काढण्यासाठी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दोन ते तीन रुपयांनी वाढवल्या जावू शकतात. तथापि ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जाईल असे म्हटले जात आहे.

Advertisement

दि. 27 फेब्रुवारीपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. उलट निवडणुकांमुळे मार्च आणि एप्रिलमध्ये चार वेळा इंधनाचे दर कमी करण्यात आले. तथापि, दर कमी ठेवल्यामुळे तेल कंपन्यांना मोठा झटकासहन करावा लागला आहे आणि आता त्यांना हा तोटा आणखी सहन करता येणार नाही. त्यामुळे भाववाढ होणार असेच सर्वांना वाटत आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply