Take a fresh look at your lifestyle.

ब्लॉग : आता आलाय जिरेनियम शेतीचाही भुलभुलैय्या; पहा नेमका काय आहे प्रकार

भारतीय शेती ही ट्रेंडवरही चालते. एखाद्या पिकाचे ट्रेंड सेट करण्यासाठी माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यांना फसवले जाते. आतापर्यंत कोरफड, ससेपालन, इमूपालन यासह अनेक पिक आणि पशुपालन करण्याच्या यशोगाथा आणि भन्नाट आकडेवारी दाखवून देशभरात कोट्यावधी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. सेंद्रिय आणि जैविक शेतीमध्येही सध्या असेच प्रकार चालू आहेत. एकूणच शेतीमध्ये असे होऊ न देण्यासाठी आणि वास्तवाशी बांधिलकी ठेऊन काम करण्याची गरज आहे. त्यावर डॉ. नरेश शेजवळ (कृषी अभ्यासक व व्यावसायिक) यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टचा संपादित भाग आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

Advertisement

समाज माध्यमात आलेल्या यशोगाथा वाचून शेतीत गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नका. जिरेनियम शेतीबाबत या महिन्याभरात ७ ते ८ जणांनी फोनवर विचारणा केली. त्यावर माझे स्पष्ट मत आहे की, मार्केट हातात असेल तर आणि तरच निर्णय घ्या. यापूर्वीही मागील ५ वर्षांत पाहिले तर महोगनी, अमेरिकन केशर, कडकनाथ कोंबड्या,  व्हरटिकल फार्मिंग आदि विषयात शेतकरी भरडले गेले आहेत. अशा प्रकारे नवीन एखाद्या मॉडेलबाबत काही वाचनात आले आणि कुणी गुंतवणूक करा म्हणून सांगितले तर काही प्रश्नांची चाळण वापरावी. ती पुढीलप्रमाणे :

Advertisement
  • सदर उत्पादनास नक्की मार्केट उपलब्ध आहे का? : थोडक्यात या उत्पादनास मार्केटमध्ये मागणी दिसते आहे किंवा नाही हे स्वतः पाहणे. तशी ती नसेल तर इथेच थांबा
  • व्यवसायाचे नेमके अर्थशास्त्र काय, निव्वळ नफा किती? : तुमचे उत्पादन अमुक भावाला आम्ही घेऊ, तुम्हाला तमुक लाख, कोटी परतावा मिळेल असे सांगणाऱ्या एजंसी स्वतः नक्की फायदेशीर रित्या ते करू शकतात का हे तपासणे. जर ती माहिती मिळत नसेल, तर इथेच थांबा.
  • असे मॉडेल्स प्रमोट करणारे सुरवातीच्या गुंतवणुकीसाठी त्यांची एकाधिकारशाही राबवतात का? की त्यासाठी तुम्हाला चॉईस आहे? : उदा. आमचीच रोपे घ्यावी लागतील, स्ट्रक्चर आम्हीच उभे करू. यामधून तुम्हाला कळेल की व्यवसाय उभा राहण्याआधीच संबंधित एजंसी तुम्हाला काहीतरी विकून बसली आहे आणि त्यांनी सांगितलेला भविष्यातील गडगंज नफा हा दोन, पाच, दहा वर्षानी वगैरे मिळणारा असेल वगैरे. असे जाणवले. तर इथेच थांबा.
  • संबंधित एजंसी, प्रमोटर कोण आहेत? कायदेशीर बाबी काय? करार, संरक्षण वगैरे काय? : शक्यतो LLP लिमीटेड लायबिलिटी पार्टनरशिप असतील तर जास्त सावध रहा. कारण यातील एखाद्या कर्मचाऱ्याने तुम्हाला दिलेल्या प्रॉमिस करीता मालक बांधील असतीलच असं नाही. काही घोळ झाला तर ते सहिसलामत असतील. LLP ही संकल्पना अमेरिकेत यासाठीच बनवली आणि प्रसिद्ध झाली. या तुलनेत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची जबाबदारी अधिक आहे. कंपनीसाठी ऑडिट प्रोसेस, बंधने अधिक. थोडक्यात तुमची फसवणूक होणार नसेल आणि झाली तर वसूल करता येण्याजोगी परिस्थिती अनुपलब्ध असेल. तर इथे थांबा.

शेतीसारख्या कोणतीही एकाधिकार शाही नसणाऱ्या व्यवसायात सरासरी २०-३० % हून अधिक निव्वळ नफा असू शकत नाही हे अंतिम सत्य आहे. कुणी जर हे नफ्याचे आकडे प्रचंड फुगवून काहीतरी गळ्यात मारत असेल तर तात्काळ थांबाच. याच पोस्टवर बांबू लागवड, शतावरी, ड्रॅगन फ्रूट, पाषाणभेद आदि वनस्पतीबाबतही अनेकांनी यामध्ये प्रतिक्रियेत चर्चा केली आहे. एकूणच शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांपासून सावध राहण्याचा सल्ला याद्वारे देण्याचा प्रयत्न आहे.

Advertisement

डॉ. अंकुश चोरमुले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे की, त्या व्हर्टिकल फार्मिंगमध्ये कोटी रुपयांची हळद उत्पादन करून देणाऱ्या कंपनीने लोकांना काय रिटर्न्स दिले का? का गेली तीही पोबारा करून बाकीच्यांचे सारखा.. महोगणीच्या बाबतीत हेच लोकांना सांगता सांगता माझी 2 वर्ष गेली. तेव्हा बऱ्याच लोकांना माझी माहिती खोटी वाटली. जेव्हा का कंपन्या फक्त रोपे विकून पसार झाल्या तेव्हा लोकांना जाग आली. 2013 ला लावलेली झाडे आज बरेच जण जळाऊ लाकूड म्हणून विकत आहेत.. कोणतीही गोष्ट करताना आधी मार्केटचा विचार करणे गरजेचे आहे. आणि नंतरच त्याची शेतात अंमलबजावणी. आज-काल चढ्या मार्गानं केल्या जाणाऱ्या यशोगाथा यासाठी खूप जबाबदार आहेत. युट्युबवर बरेच चॅनल्स आहेत. त्याच्यावर अशा फेक यशोगाथा ही प्रमोट केल्या जातात आणि त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे स्वतः शेतकऱ्यांनी सजग साक्षर होणे गरजेचे आहे नाहीतर अशा कंपन्या दरवर्षी शेतकऱ्याच्या गळ्याला नख लावणार हे निश्चित. कोणाला माहित असेल तर एक कोटी वाल्या हळद कंपनीचे काय झालं तेवढं कळवा..!

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply