Take a fresh look at your lifestyle.

मोदींना आले की चीनचे पत्रही; पहा नेमके काय म्हटलेय त्यामध्ये..!

दिल्ली :

Advertisement

वर्षभरापासून भारत-चीन सीमावाद भडकला आहे. मुजोर चीनने अनेकदा कुरापती काढूनही त्यांना त्यात अपयश आलेले आहे. अशावेळी आता कुठे चीनच्या अध्यक्षांना उपरती सुचली आहे. क्षी जीनिपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मदतीची भावना असल्याचा संदेश दिला आहे. त्याला आता भारत सरकार कसे प्रत्युत्तर देते याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. भारतात कोरोना विषाणूच्या साथीच्या विषयाबद्दल संवेदना व्यक्त करतानाच त्यांनी रुग्णवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. जीनिपिंग यांनी संदेशामध्ये असे म्हटले आहे की, चीन हा भारताबरोबर या साथीचा रोगविरोधी सहकार्य मजबूत करण्यास आणि देशाला पाठबळ देण्यासाठी तयार आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनीही गुरुवारी देश भारताला सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले होते.

Advertisement

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात वांग म्हणाले होते की, भारत सामोरे जात असलेल्या आव्हानांबद्दल मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. चिनी राजदूत सन वेडोंग यांनी ट्विटरवर पत्र लिहून म्हटले आहे की, कोरोना व्हायरस हा मानवतेचा समान शत्रू आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. चिनी बाजूंनी साथीच्या लढाईत भारत सरकार आणि तिथल्या जनतेचे समर्थन केले आहे.

Advertisement

वांग यांनी पुढे म्हटले की, चीनमध्ये उत्पादित साहित्य द्रुतगतीने भारतात आणले जात आहे. यामुळे साथीच्या रोगात भारताला मदत होऊ शकेल. चीन हा भारताच्या गरजा भागविण्यासाठी शक्य तेवढ्या प्रमाणात पाठबळ आणि मदत देत राहील. आम्हाला विश्वास आहे की भारत सरकारच्या नेतृत्वात लोक लवकरात लवकर या महामारीवर मात करतील.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply