Take a fresh look at your lifestyle.

बफेज ट्रिक्स : शेअर बाजारातून पैसे कमावण्यासाठी लक्ष द्या या 5 मुद्द्यांकडे

मुंबई :

Advertisement

जगभरात करोना कहर जोरात असल्याचा फटका शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनाही बसत आहे. मार्केट स्टेबल न राहता वर-खाली हेलकावत आहे. अशावेळी आपणही नवीन गुंतवणूकदार असाल किंवा यातले जुने खिलाडी असाल, तरीही आपल्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. कारण, याद्वारे आपण सुप्रसिद्ध अरबपती वॉरन बफे यांच्या 5 महत्वाच्या ट्रिक्स जाणून घेणार आहात.

Advertisement

अमेरिकेचे अब्जाधीश वॉरेन बफेचे यांचे नाव जगातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. शेअर बाजाराच्या गुंतवणूकीच्या जोरावर जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान पक्के राखणारे वॉरन बफे यांचेह यश हे त्यांच्या अत्यंत नियोजित गुंतवणूक धोरणात आहे आहे.

Advertisement

ज्ञान महत्वाचे : केवळ आपल्या समजुतीच्या किंवा त्रोटक आधारावर पैसे गुंतवणूक करू नका. मोठ्या नफ्याचे आश्वासन देणाऱ्या गुंतवणूकीच्या योजना काळजीपूर्वक पाहून घ्या. ज्या गुंतवणूकीत पैसे कसे वाढतात हे आपणास व्यवस्थित समजत नाही तर त्यापासून दूर रहाणे चांगले. आपण केवळ आपल्या ज्ञान आणि समजुतीवर अवलंबून राहून आपल्या गुंतवणूकीचे निर्णय घ्यावेत. सल्ला आणि मार्गदर्शन यांच्या भरवश्यावर पैसे लावू नयेत.

Advertisement

व्यवसायाची गुणवत्ता पाहून गुंतवणूक करा : नवीन कंपनीत गुंतवणूक करताना प्रत्येकजण संकोचतो. आपल्या मनात हा प्रश्न उद्भवतो, की नुकत्याच सुरू झालेल्या किंवा पुढे जाण्याच्या प्रक्रियेत असलेल्या कंपनीत पैसे गुंतवणे कितपत योग्य आहे? दुसरीकडे हाय प्रोफाइल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याकडे सर्वच आकर्षित होतात. त्यांच्यामध्ये मोठ्या परताव्याची आशा ठेवली जाते. परंतु याबद्दल वेगळ्या मार्गाने विचार करणेदेखील आवश्यक आहे. एखादी कंपनी अत्यंत चांगल्या प्रतीची उत्पादने तयार करीत आहे किंवा आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत आहे असे आपल्याला वाटत असल्यास आपण त्यामध्ये गुंतवणूकीचा विचार करू शकता. अशा नवीन कंपनीचे शेअर्स कालांतराने खूप वेगाने वाढू शकतात. पूर्वी स्थापित आणि हाय प्रोफाइल कंपनीच्या शेअर्समध्ये इतका बाऊन्स असू शकत नाही. चांगल्या कंपनीचे शेअर्स शानदार किंमतीवर खरेदी करण्यापेक्षा, योग्य कंपनीचे शेअर्स माफक किंमतीवर विकत घेणे चांगले, असे वॉरन बफे यांचे मत आहे.

Advertisement

दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा : शेअर विकत घेतल्यानंतर तातडीने विकण्याचा अजिबात विचार करू नका. चांगल्या कंपन्यांचे शेअर माफक किमतीला घेऊन ठेवा. गुंतवणूक एकाच दिवसात किंवा अगदी कमी वेळात विक्री करण्यापेक्षा दीर्घ कालावधीसाठी शेअर ठेवा. चांगल्या व्यवसायाचे मूल्य वेळोवेळी वाढते आणि त्याच वेळी त्याची शेअर किंमतही वाढते. म्हणून चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगल्या परताव्यासाठी संयम बाळगा. शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक शेवटी योग्य नफा देते. जर तुम्ही योग्य कंपन्या निवडल्या तरच हे शक्य आहे म्हणा.

Advertisement

बाजारभाव आणि स्टॉकचे मूल्य यांच्यातील फरक लक्षात ठेवा : नेहमी लक्षात ठेवा की स्टॉकची सध्याची बाजार किंमत आणि त्याचे वास्तविक मूल्य या दोन भिन्न गोष्टी आहेत. बाजारात शेअर्सची किंमत प्रत्येक क्षणाला बदलते. बर्‍याच वेळा शेअर्सची किंमत आणि तिचे खरे मूल्य यात कोणतेही गणित जुळत नाही. दर सेकंदाला बाजाराच्या स्क्रीनवर चमकणाऱ्या शेअर किंमतीऐवजी आपण आपल्या गुंतवणूकीचे मूल्य पहावे. बाजारातील मंदीनंतरही बरेच गुंतवणूकदार अत्यंत यशस्वी असतात. तर बरेच गुंतवणूकदार घाईने तोटा करून घेतात. परंतु अशा वेळी आपण सध्याच्या किंमतीऐवजी आपल्या स्टॉकचे योग्य मूल्य पाहिले तर आपण गुंतवणूकीबद्दल चांगले निर्णय घेण्यास सक्षम असाल.

Advertisement

शेअर बाजारातून पैसे कमविणे म्हणजे लॉटरीचा खेळ नाही : स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे लॉटरीचे तिकीट खरेदी करणे आणि रात्रीतून श्रीमंत होण्यासारखे नाही. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी चांगल्या कंपन्यांची निवड करताना कठोर परिश्रम घ्यावे लागतात. स्वत:साठी एक चांगला गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करणे ही एक लांबलचक प्रक्रिया आहे. ज्यासाठी खूप संयम आवश्यक आहे. लवकरात लवकर नफा कमवण्याच्या लोभामुळे चुकीची गुंतवणूक होऊ शकते. शेवटी तुमच्यासाठी हे हानिकारक ठरू शकते. चांगल्या परताव्यासाठी आपण अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी. ज्यांचे व्यवसाय मॉडेल तसेच व्यवस्थापन देखील चांगले आहे अशा कंपन्यांना प्राधान्य द्यावे. उलट केवळ जाहिराती आणि पोकळ युक्त्यांद्वारे लोकांना आकर्षित करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे टाळावे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply